नांदेड(प्रतिनिधी)-मौजे धोनारा ता.भोकर येथे आपल्या घरावर आकोड्याच्या सहाय्याने विद्युत पुरवठा चोरीने घेणाऱ्या 14 जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व लोकांनी मिळून 2 लाख 40 हजार 500 रुपयांची विज चोरी केली आणि 28 हजार रुपयांचे नुकसान केले आहे असे तक्रारीत लिहिलेले आहे.
भोकर येथील सहाय्यक अभियंता वीज वितरण कंपनी संदीप नागोराव भंडारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 20 जुलै 2022 रोजी एक वर्षापासून मौजे धानोरा ता.भोकर येथे गंगाधर पोंगेवाड, वैभव रामदास लामदे, राजाराम संभाजीपद नव्हाते, दत्ता दिगंबर करपे, मारोती माधव तोटेवाड, गणपती जळबाजी कोंडामंगल, चंपत नारायण, तुकाराम रामदास शेंडगे, बालाजी रामजी डेमके, किसन नामदेव पोगेवाड, मधुकर लक्ष्मण लामो, हनमंत लक्ष्मण कानकोर, पंढरी गणपत कोंडामंगल, नारायण मारोती खाडरे यांनी एकूण 16 हजार 806 वीज युनिटची चोरी केली. त्यामुळे 2 लाख 40 हजार 500 रुपये अशी त्या वीज चोरीची किंमत लिहिलेली आहे आणि 28 हजार रुपयांचे नुकसान केले असे तक्रारीत लिहिलेले आहे. भोकर पोलीसांनी भारतीय विद्युत कायदा कलम 135 नुसार गुन्हा क्रमांक 341/2022 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस अंमलदार हनवते हे करीत आहेत.
14 वीज चोरांविरुध्द गुन्हा दाखल