श्री गणेश विसर्जन; शहरात 22 ठिकाणी गणेशमुर्ती संकलन केंद्र

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड महानगरपालिकेने आपल्या क्षेत्रीय कार्यालयांच्या अंतर्गत शहरात 22 जागी श्री गणेश मुर्ती संकलन केंद्र तयार केले आहेत. महानगरपालिकेच्यावतीने जनतेला या संकलन केंद्रावर श्री गणेशमुर्ती देण्यासाठी विनंती करण्यात आली आहे. श्री गणेशपुजेचे निर्माल्य सुध्दा इतर ठिकाणी न टाकता ते संकलन केंद्रावर द्यावे असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे.
श्री गणेशजींच्या कांही मुर्ती पर्यावरण पुरक असतात, काही मुर्ती पाण्यात विरघळत नाहीत त्यासाठी महानगरपालिकेने तयार केलेल्या संकलन केंद्रावर श्री गणेशमुर्ती दिल्या तर त्यांचे विसर्जन महानगरपालिकेच्यावतीने पासदगाव आणि सांगवी या ठिकाणी तयार केलेल्या कृत्रीम तलवामध्ये करण्यात येणार आहे. याच संकलन केंद्रावर निर्माल्य संकलन करण्याची सोय सुध्दा करण्यात आली आहे.
महानगरपालिकेच्यावतीने तरोडा सांगवी भागात श्री चक्रधर, श्री विठ्ठल रुकमाई मंदिर परिसर, अष्टविनायकनगर श्री अष्टविनायक गणपती मंदिर, श्री साईबाबा मंदिर परिसर चैतन्यनगर, महाकाली देवि मंदिर परिसर नमस्कार चौक अशा चार ठिकाणी संकलन केंद्र तयार ठेवले आहेत. अशोक नगर भागात क्षेत्रीय कार्यालय क्रमांक 2 अशोकनगर पाण्याची टाकी, श्री.स्वामी समर्थ मंदिर मगनपुरा आणि महाराणा प्रताप चौक अशा तीन ठिकाणी श्री गणेश मुर्ती संकलन केंद्र तयार केले आहेत. शिवाजीनगर क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत श्रीकृष्ण मंदिर काबरानगरा, श्री हनुमान मंदिर बजाजनगर, श्री साईबाबा मंदिर रामानंदनगर, श्री.राममंदिर गणेशनगर, श्री.छत्रपती शाहु महाराज पुतळा पावडेवाडी, श्री गणेश मंदिर गणेशनगर, श्री.हनुमान मंदिर विजयनगर मंगल कार्यालय, श्री.गणेश मंदिर फुलेनगर, श्री.बालाजी मंदिर पारसनगर, श्री.हनुमान मंदिर गोरक्षण गोकुळनगर, श्री.हनुमान मंदिर सन्मित्रनगर, वजिराबाद क्षेत्रीय कार्यालय क्रमांक 5 जुना मोंढा आणि नावघाट या दोन ठिकाणी मुर्ती संकलन केंद्र तयार राहणार आहेत. सिडको वाघाळा परिसरात मनपा दवाखाना सिडको/क्षेत्रीय कार्यालय क्रमंाक 6 आणि नावघाट अशा एकूण 22 ठिकाणी महानगरपालिकेने श्री गणेशमुर्ती संकलन केंद्र आणि निर्माल्य संकलन केंद्र तयार केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *