नांदेड(प्रतिनिधी)-गणेश चतुर्दशीनिमित्त होणाऱ्या श्री गणेश विसर्जन सोहळ्यादरम्यान पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांनी रोजच्या काही नियमित मार्गांमध्ये बदल केला आहे. जनतेने बंद असलेल्या मार्गांची जाण ठेवून आपला प्रवास करावा. ज्यामुळे जनतेला 9 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते मध्यरात्री 12 वाजेदरम्यान आपल्या प्रवासाचे नियोजन योग्य करता येईल.
9 सप्टेंबर रोजी श्री.गणेश विसर्जन होणार आहे. या कालावधीत गणपती मंडळांना, सर्वसामान्य नागरीकांना आपले श्री गणेश विसर्जन करण्यामध्ये काही अडथळा होवू नये तसेच या काळात काही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवून नये म्हणून पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांनी दि.9 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजेपासून ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत काही रस्ते बंद केले आहेत. त्यासाठी पर्यायी मार्ग सुध्दा उपलब्ध करून दिले आहेत. ते पुढील प्रमाणे आहेत.
वाहतूकीकरीता बंद असलेले शहरातील मार्ग
जुना मोंढा, देणा बॅंक, महाविर चौक, तरोडेकर मार्गे, वजिराबाद चौक, कलामंदिर, शिवाजीनगर ते आयटीआयपर्यंत जाण्या-येण्याचा मार्ग बंद. राजकॉर्नरकडून आयटीआयकडे येण्यासाठी राजकॉर्नर, वर्कशॉप टि पॉईंट, श्रीनगर ते आयटीआयपर्यंत डावी बाजू बंद राहिल. राजकॉर्नर ते तरोडानाकाकडे जाण्यासाठी डावी बाजू बंद राहिली. सिडको, हडको मार्गे जुना मोंढाकडे येणारी वाहतूक पुर्णपणे बंद आहे. यात्रीनिवास ते जुना मोंढा, बर्कीचौक हा रस्ता एक मार्गी असल्याने जाण्या-येण्याकरीता पुर्णपणे बंद राहिल. सिडको-हडको, लातूर फाटाकडून नांदेड शहराकडे नावघाट पुलावरुन इतवारा भागात आणि नवीन पुलावरून जुना मोंढा भागात येणारी वाहतुक पुर्णपणे बंद राहिली.
नागरीकांसाठी वाहतुक सहज व्हावी तयार केलेले पर्यायी मार्ग
वजिराबाद चौकाकडून श्रीनगर, वर्कशॉपकडे जाणारी वाहतुक वजिराबाद चौक, पोलीस मुख्यालय, लालवाडी पुल, शिवाजीनगर, पिवळीगिरणी ते गणेशनगर वायपॉईंटकडे जाण्या-येण्यासाठी वापरता येईल. राजकॉर्नर ते जुना मोंढा मार्गावरील वाहतुक राज कॉर्नर, वर्कशॉप कॉर्नर, भाग्यनगर, आनंद नगर, नागार्जुना टी पॉईंट, अण्णाभाऊ साठे चौक,यात्रीनिवास पोलीस चौकी, अबचलनगर ते पुढे जाण्या-येण्यासाठी वापरता येईल. आयटी आय चौक ते अण्णाभाऊ साठे पुतळा चौक, व्हिआयपी रोड दोन्ही बाजूने जाण्या-येण्यासाठी वापर करता येईल. गोवर्धनघाट पुलावरून नांदेड शहरात येणारी वाहतुक पोलीस मुख्यालय, लालवाडी, पिवळीगिरणी ते गणेशनगर वाय पॉईंटकडे जाण्याकरीता वापरता येईल. सिडको-हडकोकडून येणारी वाहतुक साई कमान, गोवर्धनघाट, नवीन पुल, तिरंगा चौक, पोलीस मुख्यालय, लालवाडी, पिवळी गिरणी ते गणेशनगर वाय पॉईंटकडे जाण्याकरीता वापरण्यात येईल. यात्रीनिवास ते जुना मोंढा, बर्कीचौक मार्गावरील वाहतूक, महम्मद अली रोड किंवा धान्य मार्केट, वाटमारी रोड किंवा बर्की चौक ते लोहारगल्ली रोड, भगतसिंघ चौक, अबचलननगर यात्रीनिवास पोलीस चौकी, बाफना टी पॉईंट ते पुढे जाण्या-येण्यासाठी वापरता येईल. लातूरफाटा, सिडको-हडको, ढवळे कॉर्नर, चंदासिंग कॉर्नर, धनेगाव चौक, वाजेगाव, जुना पुल, देगलूर नाका पुढे बाफना मार्गे जाण्या-येण्याकरीता वापरता येईल.
श्री विसर्जन सोहळा दरम्यान वाहतुक मार्गांमध्ये बदल ; जनतेने पर्यायी मार्गांद्वारे 9 सप्टेंबरचा प्रवास नियोजित करावा-प्रमोद शेवाळे