
नांदेड(प्रतिनिधी)-आज भाद्रपत शुध्द चतुर्दशी दहा दिवसांच्या श्री गणेश सोहळ्यातील शेवटचा दिवस. आज घरगुती श्री गणेशमुर्तींचे आणि सार्वजनिक गणेश मुर्तीचे विसर्जन मोठ्या उत्साहात सुरू आहे. पावसाने हजेरी लावून गणेश विसर्जनात रंगत आणली. गोदावरी नदीकाठी असणाऱ्या मल्लनिसारण वाहिणीतून वाहणारे पाणी या सोहळ्याला डाग लावत होते.
आज अनंत चतुर्दशी दिवशी सुर्योदयाच्या अगोदरपासून काही जणांनी आपल्या घरी विराजमान असलेल्या श्री गणेशाच्या विसर्जनास सुरूवात केली. हळूहळू घरातील मंडळी आपल्या बालकांसह, कुटूंबासह, मुलींसोबत मिळून श्री गणेशाची मुर्ती घेवून नदीकाठी गेले आणि त्यांचे विसर्जन करण्यात आले.
काही काळानंतर सार्वजनिक गणेश मंडळातील मुर्ती वाजत-गाजत निघाल्या आणि हळूहळू त्या विसर्जनस्थळाकडे जात आहेत. अनेकांनी आपल्या गणेशमुर्ती महानगरपालिकेने तयार केलेल्या संकलन केंद्रावर दिल्या. या संदर्भाने कोणतीही गडबड होवू नये म्हणून पोलीस आपल्या कामावर मेहनत घेत होते.
आज सकाळपासूनच पावसाने सुध्दा आपली हजेरी लावली होती. त्यामुळे पाणी सर्वत्र वाहत होते. त्याच परिणामातून गोदावरी नदीकाठून वाहणारे अनेक मल्लनिसारण चेंबर्स भरून वाहत आहेत. या चेंबर्समधून निघारे घाण पाणी मात्र विसर्जनसाठी गेलेल्या गणेश भक्तांना त्रासदायक ठरत होते.
