नांदेड(प्रतिनिधी)-धर्माबाद येथे एका दारु व्यवसायीकाचे पाच लाख रुपये बळजबरीने चोरून नेल्याचा प्रकार 8 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 ते 11.30 असा दिवसाढवळ्या घडला आहे.
दि.8 सप्टेंबर रोजी एलोरा वाईन शॉपचे मालक व्यंकटेश गौड काशा गौड कंदननुरी हे आपल्या दुकानातील वॉईन शॉप विक्रीचे 5 लाख रुपये घेवून घरी आले. ती पैशाची बॅग बेडरुममध्ये ठेवून वॉश रुममध्ये गेले. एवढ्यात काही अज्ञात आरोपींनी त्या घरात प्रवेश केला आणि त्यांच्या आईला चाकुचा धाक दाखवून तिला खाली ढकलून दिले आणि 5 लाखांची बॅग घेवून पळून गेले. धर्माबाद पोलीसंानी हा गुन्हा क्रमांक 220/2022 दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरिक्षक कत्ते अधिक तपास करीत आहेत.
धर्माबादमध्ये पाच लाख रुपयांची जबरी चोरी