नांदेड(प्रतिनिधी)-लोहा तालुक्यातील नागदरवाडी शिवारात आणि रमनेवाडी शिवारात दोन नातलग महिला आणि पुरुष यांचा विज पडून मृत्यू झाल्याची घटना आज दि.12 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता घडली आहे.
नागदरवाडी येथील संगीता तातेराव केंद्रे (50) यांची मुलगी पांडूरंग कंधारे रा.नमनेवाडी ता.लोहा (60) यांच्या मुलाला दिलेली आहे. रमनेवाडी आणि नागदरवाडी हे दोन्ही शिवार अगदी जवळ-जवळ आहेत. आज दुपारी संगीता केंद्रे आणि पांडूरंग कंधारे हे शेतातील शेंगा तोडत असतांना जोरदार आवाजसह त्या भागत विज पडली आणि त्या दोघांना विजेच्या धक्क्यामुळे मृत्यू झाला. या संदर्भाने माळाकोळी पोलीसंानी कायदेशीर प्रक्रिया सुरू केली असून वृत्तलिहिपर्यंत ही प्रक्रिया पुर्ण झाली नव्हती.
नागदरवाडी आणि रमनेवाडी ता.लोहा शिवारात एक महिला आणि पुरूषाचा वीज पडून मृत्यू