14 वर्षीय बालक बेपत्ता

नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस ठाणे इतवारा हद्दीतील एक 14 वर्षीय बालक शिकवणीसाठी गेला आणि परत आला नाही. इतवारा पोलीसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस निरिक्षक भगवान धबडगे यांनी जनतेला आवाहन केले आहे की, छायाचित्रातील मुलगा कोणी पाहिला असेल, त्याबद्दल काही माहिती असेल तर ती इतवारा पोलीस ठाण्यात द्यावी.
इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मारवाडगल्ली भागातील नमन परमानंद सोनी (14) हा बालक दि.12 सप्टेंबर रोजी शिकवणीला जाण्यासाठी सकाळी 7.45 वाजता घरुन निघाला. त्याची शिकवणी अबचलनगर भागात आहे. तो रात्रीपर्यंत घरी आला नाही तेंव्हा त्याच्या वडीलांनी याबाबतची माहिती इतवारा पोलीस ठाण्यात दिली. पोलीसांनी बरची मेहनत घेवून तो सकाळी शिकवणीकडे जात आहे असे सीसीटीव्ही फुटेज शोधले परंतू तो परत आलेले सीसीटीव्ही फुटेज पोलीसंाना भेटले नाहीत.
यानंतर इतवारा पोलीसंानी भारतीय दंड संहितेच्या कलम 363 नुसार गुन्हा क्रमांक 260/2022 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक रायबोळे यांच्याडे देण्यात आला आहे. इतवाराचे पोलीस निरिक्षक भगवान धबडगे यांनी जनतेला आवाहन केलेले आहे की, छायाचित्रात दिसणारा बालक कोणी कुठे पाहिला असेल, त्याबाबत कोणाला काही माहिती असेल तर याबाबतची माहिती इतवारा पोलीस ठाण्यात द्यावी. इतवारा पोलीस ठाण्याचा दुरध्वनी क्रमांक 0262236510 असा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *