नांदेड(प्रतिनिधी)-एका महिलेला जीवंत जाळण्याप्रकरणी दोन संशयीतांच्या नावासह लोहा पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
एका 37 वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार ती आणि तिची मैत्रीण स्कुटीवर प्रवास करीत असतांना 13 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजेच्यासुमारास नवघर वाडी शिवारात त्या नैसर्गिक विधीसाठी थांबवल्या असतांना एक मोटारसायकलवर दोन जण तोंडा रुमाल बांधून आले आणि त्यांनी त्या 37 वर्षीय महिलेच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना जीवंत जाळण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी आरडा ओरड केली तेंव्हा त्यांची मैत्रीण आली. या फिर्यादीमध्ये या महिलेने बालाजी ईबितदार रा.लादगा ता.मुखेड जि.नांदेड आणि त्याचा एक मित्र नाव माहित नाही अशा दोघांची नावे संशयीत म्हणून दिली आहेत. लोहा पोलीसांनी याप्रकरणी गुन्हा क्रमांक 182/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 307 आणि 34 नुसार दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरिक्षक शेख यांच्याकडे तपास देण्यात आला आहे.
महिलेला जीवंत जाळण्याचा प्रयत्न