नांदेड,(प्रतिनिधी)- सन २०२१ मध्ये पोलिसांवर झालेल्या जीवघेणा हल्ला प्रकरणात २१ महिन्यांनंतर एक फरार आरोपी गुरुद्वारा बोर्डाचे माजी सचिव जिल्हा न्यायालयात हजर झाल्या नंतर न्यायालयाने त्यांची रवानगी एमसीआरमध्ये केली आहे. पण सध्या ते दवाखान्यात उपचार घेत आहेत.जिल्हा न्यायालयाने अटक प्रक्रिया पूर्ण झाल्यावर जामीन देणे बाबत विचार होईल असे अनेक विधिज्ञांनी सांगितले आहे.
२९ मार्च २०२१ रोजी एक मिरवणूक काढण्याच्या कारणावरून वाद झाला आणि त्यात पोलिसांवर जीवघेणा हल्ला घडला.याबाबत वजिराबाद पोलीस ठाण्यात तीन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले. त्यात एक गुन्हा क्रमांक ११४/२०२१ असा आहे.या गुन्ह्यात जवळपास एकूण ५८ आरोपीना अटक झालेली आहे. पोलिसांनी जवळपास २० आरोपीना भारतीय प्रक्रिया संहितेच्या कलम २९९ प्रमाणे फरार घोषित करून न्यायालयात दोषारोप पत्र पाठवले आहे. त्यावर आता हा सत्र खटला क्रमांक १७२/२०२१ या क्रमांकाने न्याय प्रक्रियेत आहे.
दिनांक १२ सप्टेंबर २०२१ रोजी गुरुद्वारा बोर्डाचे माजी सचिव रविंद्रसिंघ आशासिंघ बुंगई हे आपण स्वतःच नांदेडच्या जिल्हा न्यायालयात हजर झाले. न्यायालयाने त्यांना एमसीआरमध्ये पाठवले.तुरुंगात जाण्या अगोदर त्यांना आरोग्य समस्या झाली.तेव्हा त्यांना उपचारासाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले.आजही ते दवाखान्यात आहेत.
इकडे न्यायालयात रविंद्रसिंघ आशासिंघ बुंगई यांनी आपल्याला जामीन मिळावा या साठी अर्ज सादर केला.न्यायालयाने त्यात सुनावणीची तारीख १४ सप्टेंबर निश्चित केली होती.पण पुढे या प्रकरणात तांत्रिक मुद्दा उपस्थित झाला की,अटक झालीच नाही तर जामीन कसा देता येईल.तेव्हा न्यायालयाने पोलिसांना पत्र देऊन तुरुंग अधीक्षकांकडून रविंद्रसिंघ आशासिंघ बुंगई यांचा ताबा मिळवा आणि पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करा अशी सूचना दिली असल्याची माहिती खात्री लायक सूत्रांनी दिली आहे. प्राप्त माहितीनुसार रविंद्रसिंघ आशासिंघ बुंगई यांची दवाखान्यातून सुट्टी झाल्या नंतर त्यांना वजिराबाद पोलीस ताब्यात घेतील. नंतर पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर करतील.त्या प्रक्रियेतून पुन्हा एमसीआर झाल्यावर रविंद्रसिंघ आशासिंघ बुंगई यांच्या जामीन अर्जावर विचार होईल असे अनेक विधिज्ञांनी सांगितले.