नांदेड(प्रतिनिधी)-एका बालिकेच्या नावाची विमा पॉलीसी कंपनीतील 49 टक्के भाग भांडवलाची रक्कम 73 लाख 50 हजार रुपये तिच्या पालक असलेल्या आईला न सांगता काढून घेतल्याचा प्रकार घडला आहे. महिलेच्या सासरच्या पाच मंडळीविरुध्द मांडवी पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
28 वर्षीय महिला जि मांडवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या पतीचे निधन झाले आहे आणि त्यांची 6 वर्षांची अल्पवयीन बालिका बाणीप्रिया हे दोघे जिवंत आहेत. बाणीप्रियाच्या नावाने एचडीएफसी कंपनीची लाईफ क्लिक पॉलीसी काढण्यात आली होती. या पॉलीसीचा क्रमांक 22229611 असा आहे. कंपनीचे 49 टक्के भाग भांडवल बाणीप्रियाच्या नावाने आहे. बाणीप्रियाची अज्ञान पालक आई आहे. तिच्या सासरच्या मंडळीतील लोकांनी कट रचून एकत्रितपणे ते 73 लाख 50 हजारांचे भाग भांडवल आईला न सांगता काढून घेतले. त्यांनी विचारणा केली तर त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.
या तक्रारीवरुन मांडवी पोलीसांनी तक्रारदार महिलेच्या सासू सिंधूताई धरमसिंग चव्हाण (53), सासरे धरमसिंग कनीराम चव्हाण (57), मोठे भासरे राहुल धरमसिंग चव्हाण(38),छोटे भासरे संदीप धरमसिंग चव्हाण (37) आणि चुलत सासरे दिलीप कनीराम चव्हाण (51) यांच्याविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 498(अ), 504, 506 आणि 34 नुसार गुन्हा क्रमांक 73/2022 दाखल केला आहे. मांडवीचे सहाय्यक पोलीस निरिक्षक मल्हारी शिवरकर अधिक तपास करीत आहेत.
सासरच्या मंडळीनी आपल्या नातीच्या नावावरील 73 लाख 50 हजार हडपले