नांदेड(प्रतिनिधी)-स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव निमित्ताने अपघात विरहीत सेवा देणाऱ्या ऍटो चालकांचा अंतरराष्ट्रीय चालक दिनी सन्मान करण्यात येणार आहे असे पत्र उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी अध्यक्ष टायगर ऍटो रिक्षा संघटना नांदेड यांना पाठविले आहे.
टायर ऍटो रिक्षा संघटनेचे अध्यक्ष अहेमद (बाबा) बागवाले यांनी 1 ऑगस्ट 2022 रोजी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त अपघात विरहीत सेवा देणाऱ्या ऍटो चालकांचा सन्मान करण्याची विनंती प्रादेशीक परिवहन कार्यालयाला केली होती. त्या पत्राला अनुसरून उप प्रादेशीक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांच्या स्वाक्षरीने एक पत्र निर्गमित करण्यात आले आहे. त्या 17 सप्टेंबर 2022 मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आणि आंतरराष्ट्रीय चालक दिन असे या दिवसाला घोषित करण्यात आले आहे. त्यानिमित्त नांदेड जिल्ह्यातील प्रामाणिक सेवा देणारे ऍटो रिक्षा चालकांचा सत्कार करण्यात येणार आहे. तेंव्हा दि.17 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजता प्रामाणिक सेवा देणाऱ्या सर्व ऍटो चालकांनी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात उपस्थित राहण्याची सुचना अविनाश राऊत यांनी केली आहे.
17 सप्टेंबर रोजी प्रामाणिक सेवा देणाऱ्या ऍटो चालकांचा आरटीओ कार्यालयात होणार सत्कार