
नांदेड(प्रतिनिधी)-राहुल विचार मंचचे जिल्हाध्यक्ष अंकुश किशोर जोंधळे यांच्या जन्मदिनी अनेक सामाजिक उपक्रम घेवून आपला जन्मदिन जोंधळे यांनी समाजाच्या भल्यासाठी समर्पित केला.
राहुल विचार मंचचे जिल्हाध्यक्ष अंकुश किशोर जोंधळे यांच्या जन्मदिनानिमित्त सुमन बालगृह येथे अन्नदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे आयोजन मागासवर्गीय विभाग कॉंगे्रस कमिटीचे जिल्हाउपाध्यक्ष संजय वाघमारे यांनी केले होते. पंचायत समिती सदस्य मंगेश कदम, कॉंगे्रस शहर सचिव सुभाष काटकांबळे, सोनु राऊत, संजय भोसले, सत्यजित ढवळे, गजानन स्वामी, कैलास हनमंते, सौरभ बोडके, करण दुधाटे आदी मित्र परिवाराने या कार्यक्रमात सहभाग घेतला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाचलनालय रविवार पेठ इतवारा येथे मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये पॅथॉलॉजी टेस्ट, नेत्र तपासणी असे कार्यक्रम प्रमुख होते. या कार्यक्रमात राहुल हंबर्डे यांनी उद्घाटन केले. या कार्यक्रमात निलेश पावडे, उपमहापौर अब्दुल गफार, रेखा चव्हाण, सुरेश हटकर, दिपक पाटील आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

