
नांदेड(प्रतिनिधी)-भारताच्या 75 व्या अमृतमहोत्सव सोहळ्यादरम्यान प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेडचे प्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी अपघात विरहीत सेवा देणाऱ्या ऍटो चालकांचा आणि संघटनेचा सन्मान केला.
आज 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आणि जागतीक चालक दिन या दुहेरी सोहळ्यादरम्यान टायगर ऍटो रिक्षा संघटना आणि त्यांचे सदस्य यांचा सन्मान सोहळा प्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत, निमसे, अलकटवार, आव्हाड, ढोबळे आणि जाधव यांच्या उपस्थितीत टायगर ऍटो रिक्षा संघटना, अध्यक्ष अहेमद(बाबा) बागवाले, सदस्य धम्मपाल थोरात, मुखीद पठाण, मोहम्मद साबेद, शेख ऐसान, शेख कदीर, शेख मुखीद, गुंडू, भाऊसाहेब कांबळे, शेख जाकेर, शेख युनूस, देवासिंग बन्सी आणि गंगाधर सरोदे आदी ऍटो रिक्षा चालकांचा सत्कार करण्यात आला.