नांदेड(प्रतिनिधी)-नवघरवाडी ता.कंधार शिवारात एक डीपी खाली पाडून त्यातून 9 हजार 600 रुपयांचे ऑईल चोरल्याचा प्रकार घडला आहे.
महावितरण कार्यालय कंधार येथील कनिष्ठ तंत्रज्ञ अरबाज दावलशाह सय्यद यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 16 सप्टेंबरच्या पहाटे 3 वाजेदरम्यान नवघरवाडी ते कंधार रस्त्यावरील महावितरण कंपनीने बसवलेला डीपी क्रमंाक 4447711 हा लालू गोविंद गायकवाड रा.मरघाट रस्ता नांदेड आणि सत्तार रा.रायवाडी ता.लोहा या दोघांनी खाली पाडला आणि त्यातील 60 लिटर ऑईल किंमत 9 हजार 600 रुपये ऑईल चेारले. ते आईल जवळच्या एका कापसाच्या पिकात सापडले. पुन्हा ते ऑईल डीपीमध्ये टाकण्यात आले. लोहा पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 184/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 379, 34 आणि भारतीय विद्युत कायदा कलम 136 नुसार दाखल केला. या गुन्ह्याचा तपास पोलीस अंमलदार खाडे यांच्याकडे देण्यात आला आहे.
डीपीतील 60 लिटर ऑईल चोरी