नांदेड(प्रतिनिधी)-विष्णुपूरी प्रकल्पाचे 8 दवाजे उघडण्यात आले असून त्यातून 2288 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
प्रशासनाच्यावतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार मागील दोन दिवसांपासून पुन्हा एकदा परतीच्या पावसाने झोडपण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे विष्णुपूरी प्रकल्पातील पाण्याचा साठा 352.20 मिटर झाला आहे. आज 19 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4.30 वाजता विष्णुपूरी प्रकल्पातील गेट क्रमांक 1, 5,6,7, 13, 15,16 आणि 17 उघडण्यात आले आहे. त्यातून 2288 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. शहरातील संत दासगणु पुलाजवळ पाणी पुलाच्या छतापर्यंत पोहचले आहे. सध्या पाण्याची पातळी धोक्याच्या खाली असली तरी नदी काठी राहणाऱ्या लोकांनी सतर्क राहण्याची गरज आहे.
विष्णुपूरी प्रकल्पाच्या 8 दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग सुरू