नांदेड,(प्रतिनिधी)- इतवारा भागातील परमानंद ताराचंद सोनी वय 43 वर्षे व्यवसाय गुत्तेदार रा. मारवाड़ी गल्ली इतवारा, नांदेड यांनी पोलीस स्टेशनला येवून फिर्याद दिली की नमन परमानंद सोनी वय 16 वर्षे हा शिकवणी साठी जातो म्हणुन गेला तो परत आलाच नाही अश्या फिर्यादी वरुन पोलीस स्टेशन गुरनं. 260 / 2022 कलम 363 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांचे मागदर्शनाखाली पोलिस निरिक्षक भगवान धबडगे यांनी गुन्हा दाखल करून तपास पोउपनि रायबोले यांचे कडे दिला. सदर गुन्हयामध्ये नातेवाईकांकडुन माहिती काढुन सदरचा मुलगा रुसुन जयपुर राजस्थान येथे त्याच्या अत्याकडे निघुन गेल्याचे माहिती मिळाले वरुन त्याचे आत्यास धबडगे यांनी स्वतः फोनवर संपर्क साधला असता सदर मुलगा सुखरूप असुन त्यास मी स्वतः नांदेड येथे घेवून येत आहे असे मुलाचे आत्याने सांगितले आहे.
सध्या राज्यासह नांदेड जिल्हयात सोशल मिडीया, तसेच जनतेडुन वेगवेगळ्या माध्यमातुन मुले पळविणारी टोळी, शरीराचे अवयव काढुन विकणारी टोळी आल्या बाबत सोशल मिडीया वरून अफवा पसरविण्यात येत असुन अशा अफावर विश्वास न ठेवता कांही अनुचीत प्रकार, संशयास्पद बाब आढळल्यास जनतेनी जवळचे पोलीस स्टेशनला डायल 112 वर पोलीसांशी संपर्क साधवा त्यांना तात्काळ मदत पुरविण्यात येईल. पेट्रोलींग दरम्यान पोलीस वाहनावरील पी. एफ. सीस्टम व्दारे सर्व पोलीस अधिकारी जनतेमध्ये अफवावर विश्वास न ठेवण्या बाबत जनजागृती करीत आहेत.
शहरामध्ये व ग्रामीण भागात अफवा पसरविण्यात येत आहेत कि, शाळेतील लहान मुले तसेच निराधार मुले यांना पकडुन नेऊन त्यांचे शिरीराचे अवयव काढुन विक्री करीत असले बाबत, फेरीवाले, घरोघरी जाऊन माल विकणारे इसम यांच्या टोळया आल्या असल्या बाबतची अफवा पसरविण्यात येत आहे. जनतेनी खात्री केल्याशिवाय कोणतेही मॅसेज सोशल मिडीयावर टाकुनये, अशा प्रकारे अफवा पसरवितांना आढळल्यास पोलीस विभागातर्फे कायदेशिर कारवाई करण्यात येईल. तसेच कांही अनुचीत प्रकार आढळल्यास तात्काळ मदत पुरविण्यात येईल. मुले पळवणारी टोळीतील इसम म्हणुन त्यांना मारहाण करून इजा पोहचु नये कायदयाचे उल्लंघन करू नये, महाराष्ट्रात सांगली जिल्हयामध्ये साधु संताची गाडी आडवुन त्यांना मुले पळवणारी टोळी आहे असा गैरसमज धरून त्यांना अमानुष मारहाण करण्यात आलेली आहे. मारहाण करणाऱ्या लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. अशा अफवावर जनतेनी विश्वास ठेऊ नये असे प्रमोद शेवाळे, पोलीस अधिक्षक नांदेड, निलेश मोरे, अपर पोलीस अधिक्षक नांदेड, विजय कबाडे, अपर पोलीस अधिक्षक भोकर, यांनी जनतेला आवाहन केले आहे.