नांदेड(प्रतिनिधी)-जिम्नॅस्टीक शिकण्यासाठी येणाऱ्या 15 वर्षीय मुलीवर वाईट नजर ठेवणाऱ्या प्रशिक्षकाला पोलीसांनी अटक केल्यानंतर न्यायालयाने त्यास पोलीस कोठडीत पाठविले आहे.
नांदेडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक जिम्नॅस्टी शिवकणी क्लास आहे. मुळात हा क्लास जिम्नॅस्टीक असोसिएशनच्यावीतीने चालविण्यात येतो. या क्लासचे प्रशिक्षक जयपाल रेड्डी हे आहेत. डिसेंबर 2021 पासून ही युवती जिम्नॅस्टीकचे प्रशिक्षण घेण्यासाठी येत होती. कपडे बदलण्याच्या रुमध्ये तिला प्रशिक्षक जयपाल रेड्डी निरखुन पाहत असत आणि पुढे ते तिला वेगवेगळ्या पध्दतीने चुकीच्या बाबींना प्रोत्साहन देत असत. या प्रशिक्षकाने तिला राज्यस्तरीय स्पर्धांंमध्ये पाठवले नाही. विविध घाणेरडे व्हिडीओ आणि फोटो पाठवूून ते तिला त्रास देत होते. घडलेला प्रकार त्या युवतीच्या सहनशक्ती बाहेर गेल्यानंतर तिने हा प्रकार आपल्या नातलगांना सांगितला. त्यानंतर पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे तक्रार देण्यात आली. शिवाजीनगरचे पोलीस निरिक्षक डॉ.नितीन काशीकर आणि गुन्हे शोध पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरिक्षक रवि वाहुळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक ए.एस.पवार यांनी या घटनेचा तपास करतांना प्रशिक्षक जयपाल रेड्डीला अटक केली. न्यायालयाने प्रशिक्षकाला तीन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.