नांदेड,(प्रतिनिधी)- फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १०७ प्रमाणे कार्यवाही न करण्यासाठी ४ हजारांची लाच मागून २ हजारांची लाच स्वीकारणारा कुंडलवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार लाचेची रक्कम स्वीकारून मोटारसायकलवर बसून पळून गेल्याचा प्रकार काल २० सप्टेंबर २०२२ रोजी कुंडलवाडी येथे घडला आहे.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार एका ३१ वर्षीय तक्रारदाराने तक्रार दिली की कुंडलवाडी येथे त्यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या एका या दखल पात्र गुन्ह्यात त्यांच्या विरुद्ध प्रतिबंधात्मक कार्यवाही न करण्यासाठी कुंडलवाडी येथील पोलीस अंमलदार तैनात बेग मन्सब बेग,पोह/2407, पोलीस स्टेशन कोंडलवाडी, ता.बिलोली रा. कुंठागल्ली धर्माबाद ,जि. नांदेड हे ४ हजारांची लाच मागत आहेत.त्यानुसार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे १५ सप्टेंबर २०२२ रोजी आलेल्या तक्रारीनुसार सापळा रचण्यात आला.तडजोडीनंतर लाचेची रक्कम २ हजार रुपये ठरली. शासकीय पंच आणि लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी आणि अंमलदाराच्या समक्ष लाचेची रक्कम २ हजार रुपये स्वीकारून पोलीस अंमलदार तैनात बेग मन्सब बेग,पोह/2407, पोलीस स्टेशन कोंडलवाडी, ता.बिलोली रा. कुंठागल्ली धर्माबाद ,जि. नांदेड हा दुचाकी गाडीवर बसून लाचेची रक्कम घेऊन पळून गेला आहे.
तैनात बेग या पोलीस अमंलदाराविरुद्ध पोलीस स्टेशन कोंडलवाडी गुरन 103/2022 कलम 7 भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 सह कलम 201 भारतीय दंड संहिता अन्वये येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही सर्व कार्यवाही लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ.राजकुमार शिंदे,अपर पोलीस अधीक्षक धरमसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनात पोलीस उप अधीक्षक राजेंद्र पाटील,पोलीस निरीक्षक अरविंद इंगोले,सपोउपनि संतोष शेट्टे, गजेंद्र मांजरमकर, पोह एकनाथ गंगातिर्थ,संतोष वच्चेवार,चापोह सोनटक्के यांनी पार पाडली.या पूर्वी सुद्धा इस्लापूर येथील एक पोलीस अंमलदार लाचेची रक्कम स्वीकारून पळून गेला होता ,अशी माहिती आहे.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना अवाहन केले आहे की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा.
डॉ राजकुमार शिंदे,पोलीस अधिक्षक, ला.प्र.वि. नांदेड परिक्षेत्र,नांदेड
मोबाईल क्रमांक 9420610619
राजेंद्र पाटील, पोलिस उप अधीक्षक, ला.प्र.वि. नांदेड
मोबाईल क्रमांक – 7350197197*
कार्यालय दुरध्वनी – 02262-253512*
@ टोल फ्रि क्रं. 1064*