नांदेड,(प्रतिनिधी)- विष्णुपुरी येथील श्री गुरु गोविंदसिंघजी अभियांत्रिकी महाविद्यालय महिला वसतिगृहात तृतीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार रात्री घडला आहे. सामंजस्याची भूमिका मयत युवतीच्या कुटुंबियांना समजावून सांगण्याचा प्रकार नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात घडत असल्याचा सुरु असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. युवतीने आपल्या मृत्यूची जबाबदारी निश्चित करून गळफास घेतला आहे.
गेल्या रात्री विष्णुपुरी येथील अभियांत्रिकी महाविद्यालय येथे अभियांत्रिकीच्या तृतीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या उस्मानाबाद येथील युवतीने आपल्या खोलीतील पलंगावर खुर्ची ठेवली. खिडक्यांना लावतात त्या पर्दा आपल्या गळ्यात बांधून पंख्याला गळफास घेतला आणि आपला जीव दिला आहे.
आपल्या मृत्यूची जबाबदारी कोणावर आहे याबाबत सविस्तर लिहून ठेवली आहे.त्यातील मजकुरामध्ये तिचाच वर्ग मित्र आणि राहणार वाशीम हा कसा कसा जबाबदार असलयाचे वर्णन लिहिले असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. माझ्या सारखा मृत्यू इतर मुलींना मिळू नये यासाठी मी आत्महत्या करत आहे.महिला आयोगाने सुद्धा माझ्या मृत्यूची चौकशी करावी असे त्या चिट्ठीत लिहिलेले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
युवतीच्या कुटुंबातील अनेक नातलग नांदेडला पोहचले आहेत. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात त्यांना सामंजस्याची भूमिका शिकवली जात आहे.अशी सुद्धा माहिती प्राप्त झाली आहे.वृत्त लिही पर्यंत युवतीच्या आत्महत्या प्रकरणात कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झालेली नव्हती.