अभियांत्रिकी महाविद्यालयातील युवती आत्महत्या प्रकरण; चिठ्ठीतील युवकाला पोलीस कोठडी

नांदेड(प्रतिनिधी)-अभियंता होण्याच्या तयारीत असणाऱ्या एका 21 वर्षीय युवतीला त्रास देवून तिला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या तिच्या वर्ग मित्राला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी तीन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
22 सप्टेंबरच्या रात्री 0.11 वाजेच्या पुर्वी हा आत्महत्येचा प्रकार श्री.गुरू गोविंदसिंघजी अभियांत्रिकी महाविद्यालय विष्णुपूरी येथील महिला वस्तीगृहात घडला यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील एक युवती वय 21 ही मरण पावली होती. तिने आपल्या मरणाची सविस्तर कारणे चिठ्ठीत लिहिली होती. त्यामध्ये तिचा वर्गमित्र आदेश गजानन चौधरी मुळ रा.वाशीम याने मयत युवतीच्या बहिणीचे फोटो काढून तिला ब्लॅकमेल करून मानसिक त्रास देत होतो. म्हणून मी आत्महत्या करत आहे असे चिठ्ठीत लिहिलेले आहे. या त्रासातून माझ्या एका दुसऱ्या वर्ग मित्राने मला वाचविण्याचा प्रयत्न केला.परंतू त्रास सहन होत नसल्याने मी आत्महत्या करत आहे. माझ्या आत्महत्येस आदेश गजानन चौधरी रा.वाशीम हा जबाबदार आहे. तसेच महिला आयोगाने माझ्या मृत्यूची दखल घेवून इतर कोण्या महिलेला, युवतीला अशा पध्दतीने आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही यासाठी ठोस पावले उचलावीत अशी अपेक्षा मयत युवतीने आपल्या चिठ्ठीत व्यक्त केली आहे.
या प्रकरणात 22 सप्टेंबरच्या 16.36 वाजता हा गुन्हा क्रमांक 569/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 306 नुसार मयत युवतीच्या बंधूने दिलेल्या तक्रारीवरुन दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिनिरिक्षक महेश कोरे यांच्या कडे देण्यात आला. महेश कोरे यांनी आदेश गजानन चौधरीला अटक केली. आज दि.23 सप्टेंबर रोजी महेश कोरे आणि त्यांच्या सहकारी पोलीस अंमलदारांनी आदेश चौधरीला न्यायालयात हजर केले. तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी केली ती मान्य करत न्यायालयाने आदेश गजानन चौधरीला तीन दिवस अर्थात 26 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडीत पाठवले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *