गुगलवर कस्टमर केअर क्रमांक शोधणे शिक्षकाला महागात पडले

नांदेड(प्रतिनिधी)-एका शिक्षकाने गुगलवर एसबीआय क्रेडीट कार्ड कस्टमर सर्व्हीसमधील क्रमांक शोधणे त्यांना चांगलेच महागात पडले. ठकसेनाने त्यांच्या क्रेडीड कार्ड आणि बसत खात्यातून 1 लाख 42 हजार 115 रुपये काढून घेतल्याचा प्रकार घडला आहे.
रमेश भानुदास अंधाळे हे चिखली बु (ता.किनवट) येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत. दि.29 जुलै रोजी सकाळी त्यांनी आपल्या मोबाईलवर एसबीआय क्रेडीट कार्ड कस्टमर केअर नंबर शोधला असता त्यांना 9883736075 हा क्रमांक मिळाला. त्यांनी या नंबरला कॉल केला असता त्या व्यक्तीने एसबीआय क्वीक सपोर्ट ऍप घेण्यास सांगितले आणि मोबाईलचा आयडी विचारून माझा मोबाईल हॅक केला आणि क्रेडीट कार्ड क्रमांक 472642827690 मधून 92 हजार 115 रुपये आणि बचत खाते क्रमांक 62103751664 मधून 50 हजार असे एकूण 1 लाख 42 हजार 115 रुपये ऑनलाईन काढून घेतले आहेत. किनवट पोलीसांनी हा प्रकार भारतीय दंड संहितेच्या कलम 420 नुसार गुन्हा क्रमंाक 188/2022 मध्ये दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस अंमलदार कल्लाळे हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *