नांदेड(प्रतिनिधी)- एका सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याला तोतय्या पोलीसांनी ठकवून त्यांच्याकडील 60 हजार रुपये किंमतीचा ऐवज लुटला आहे. 20 ग्रॅम सोन्याची किंमत या प्रकारात 60 हजार रुपये दाखवली आहे. कारण ते जुने वापरते सोने असल्याचे लिहिले आहे.
गोपाल रामचंद्र ओमकारे हे 65 वर्षीय सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी आपल्या पत्नीसह देगलूरच्या बसस्थानकात उतरले. तेथून त्यांना अमरापूर गल्ली येथे पायी जात असतांना देगलूरच्या गांधी पुतळ्याजवळ दोन माणसे आली आणि आम्ही पोलीस असल्याचे सांगून आपला बनावट पोलीस ओळखपत्र दाखवले. आपले दागिणे सुरक्षीत ठेवण्यासाठी त्यांनी एका कागदावर ते ठेवण्यास सांगितले. त्यात एक 5 ग्रॅमची अंगठी 15 हजार रुपये किंमतीची आणि एक 15 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन 45 हजार रुपयांची ज्या पुढे जुनी वापरती असा उल्लेख केलेला आहे आणि या 20 ग्रॅम सोन्याची किंमत 60 हजार रुपये निश्चित करून गुन्हा क्रमांक 446/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 170, 34 नुसार दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक सोहन माछरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक पुनम सुर्यवंशी यांच्याकडे देण्यात आला आहे.
तोतय्या पोलीसांनी पती-पत्नीला ठकवून 60 हजारांचा ऐवज लंपास केला