नांदेड जिल्हा सरकारी अभियोक्ता पदावर ऍड.रणजित देशमुख

नांदेड,(प्रतिनिधी)- नांदेड जिल्हा सरकारी अभियोक्ता पदावर राज्य सरकारने ऍड.रणजित नरसिंगराव देशमुख यांची तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती केली आहे.ऍड.जनकजीवन उर्फ आशिष दत्तात्रयराव गोदामगावकर यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ १७ सप्टेंबर रोजीच संपला होता.आज दिनांक २३ सप्टेंबर २०२२ रोजी विधी व न्याय विभागाचे उप विधी सल्लगार-नि-उप सचिव प्रवीण कुंभोजकर यांच्या स्वाक्षरीने ऍड.रणजित देशमुख यांच्या नियुक्तीचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

राज्य सरकारने १८ सप्टेंबर २०१९ रोजी जिल्हा व सत्र न्यायालय नांदेड येथे जिल्हा सरकारी वकील व सरकारी अभियोक्ता पदावर ऍड.जनकजीवन उर्फ आशिष दत्तात्रयराव गोदामगावकर यांची नियुक्ती केली होती.त्यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ १७ सप्टेंबर २०२२ रोजी समाप्त झाला होता.परंतु ६ दिवसांनी आज २३ सप्टेंबर २०२२ रोजी राज्य सरकारने नवीन आदेश जारी करून सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या याचिकांच्या निर्णयातील आदेशानुसार आणि उच्च न्यायालय मुंबई येथील याचिकांच्या आधारावर जिल्हा सरकारी वकील व सरकारी अभियोक्ता पदावर ऍड.रणजित नरसिंगराव देशमुख यांची नियुक्ती केली आहे. हा पुढील आदेशा पर्यंत कायम राहील.

कहाळा ता.नायगाव येथे शेतकरी कुटुंबात जन्मलेले ऍड.रणजित नरसिंगराव देशमुख यांनी सन २००० मध्ये विधी पदवी पूर्ण केली.सन २००८ मध्ये त्यांची नियुक्ती सरकारी वकील पदावर झाली.अनेक तालुका न्यायालयांमध्ये त्यांनी काम केले. सन २०१५ मध्ये सहायक जिल्हा सरकारी वकील पदावर त्यांची नियुक्ती झाली. आता अतिरिक्त पदभार देत सरकारने त्यांची नियुक्ती जिल्हा सरकारी वकील व सरकारी अभियोक्ता पदावर केली आली आहे.त्यांच्या नियुक्ती बद्दल त्यांचे कुटुंबीय, मित्र,वकील मंडळी त्यांना अभिनंदन देत आहेत. वास्तव न्यूज लाईव्हच्यावतीने ऍड.रणजित देशमुख यांना नवीन जबाबदारीसाठी शुभकामना. आज एड.रणजीत देशमुख यांनी आपल्या नविन जबाबदारीची सुत्रे स्विकारली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *