नांदेड जिल्ह्यात 19 गावातील 71 गाय वर्ग लम्पीने बाधित

जिल्हा प्रशासनातर्फे ग्राम पातळीपर्यंत लसीकरणाचे नियोजन 

 44 हजार 963 जनावरांचे लसीकरण

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यात लम्पी आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने गावपातळीपर्यंत ग्रामपंचायतींना दक्षतेचे निर्देश दिले आहेत. आजच्या स्थितीत नांदेड जिल्ह्यात एकुण 19 बाधीत गावे झाली आहेत. या बाधीत गावातील पशुधन संख्या (गाय वर्ग) 10 हजार 138 एवढी आहे. यातील लम्पी बाधीत पशुधन संख्या (गाय वर्ग) 71 एवढी आहे. बाधीत गावाच्या 5 किमी परिघातील गावांची संख्या 138 एवढी झाली आहे. एकुण गावे (बाधित अधिक 5 किमी परीघ) 157 गावातील पशुधनाची संख्या ही 48 हजार 249 एवढी आहे. यात बाधित व परिघाच्या गावातील पशुधनाची संख्या 58 हजार 387 एवढी गणण्यात आली आहे.

लसीकरणाच्या दृष्टिकोनातून सद्यस्थितीत उपलब्ध लस मात्रा 2 लाख 10 हजार एवढी आहे. आज रोजी 26 हजार 402 जनावरांचे लसीकरण झाले आहे. तर एकुण प्रागतिक लसीकरण हे 44 हजार 963 एवढे आहे. मृत पशुधनाची संख्या 2 एवढी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *