नांदेड(प्रतिनिधी)-महामार्ग सुरक्षा पथक औरंगाबाद प्रादेशिक विभागाच्या पोलीस अधिक्षक दत्ता फड यांनी त्यांच्या विभागात कार्यरत असणाऱ्या 9 पोलीस अंमलदारांना प्रतिनियुक्तीच्या काळातील कसुरीयुक्त कामांमुळे परत त्यांच्या जिल्ह्याला पाठवले आहे. या 9 जणांमध्ये पाच जण नांदेड जिल्ह्याचे आहेत.
पोलीस अधिक्षक लता फड यांनी जारी केलेल्या विविध चार आदेशानुसार या दोन जणांना परत आपल्या मुळ जिल्ह्यात पाठवियण्यात आलेले आहे. महामार्ग सुरक्षा पथकात काम करतांना त्यांच्याकडून झालेल्या विविध चुकांसाठी त्यांच्याविरुध्द कसुरी अवाहल पोलीस अधिक्षक कार्यालयाला प्राप्त झाला होता. अशा सर्व नामांकित मंडळींना पुन्हा त्यांच्या मुळ जिल्ह्यात पाठविण्यात आले आहे. त्यात नांदेड जिल्हा पोलीस दलातील, बारड मदत केंद्रात कार्यरत असलेले पोलीस हवालदार गणपत लक्ष्मण शेवाळकर(बकल नंबर 1775), उमकांता केशवराव दामेकर (722), महाचंद्रमणी भिमराव कांबळे (2884), नांदेडमदत केंद्रात कार्यरत असलेले ज्ञानेश्र्वर भिमराव तिडके (1127), बालाजी विठ्ठलराव पोतदार(605) अशा पाच जणांना त्यांच्या मुळ नांदेड जिल्हा पोलीस दलात परत पाठविून दिले आहे.
मांजरसुंबा जि.बीड येथील विलास यादवराव ठोंबरे (1357) आणि गेवराई जि.बीड येथील अजय बाबासाहेब जाधव (2217) या दोघांना मुळ बीड जिल्हा पोलीस दलात परत पाठवून देण्यात आले आहे. नळदुर्ग जि.उस्मानाबाद येथे कार्यरत अनंत रावसाहेब केंद्रे (1263) यांना उस्मानाबाद जिल्ह्यात परत पाठवले आहे. लातूर मदत केंद्रातील दत्ता हनुमंत कतलाकुटे (937) यांना मुळ नेमणूक लातूर जिल्ह्यात परत पाठवले आहे. या सर्व लोकांमधील काही जणांचा या नियुक्तीचा विहित कार्यकाळ पुर्ण होत आला आहे. पण काहींचा अद्याप पुर्ण झालेला नाही.
महामार्ग मदत केंद्रातील 9 पोलीस कसुरीसाठी परत; नांदेड जिल्ह्याचे पाच