नांदेड(प्रतिनिधी)-देगलूर महामार्ग सुरक्षा केंद्रासाठी 30 पोलीस अंमलदारांचे पथक मंजुर आहे. त्यासाठी नांदेड जिल्हा पोलीस अधिक्षकांनी 1:3 प्रमाणात प्रतिनियुक्तीसाठी इच्छूक पोलीस अंमलदारांचा सेवा तपशील या महिच्या शेवटपर्यंत पोलीस महासंचालक कार्यालयाला पाठवायचा आहे असा आदेश वाहतुक विभागाचे अपर पोलीस महासंचालक कुलवंत कुमार सारंगल यांनी पाठवला आहे.
नांदेड जिल्ह्यातील देगलूरजवळ एक महामार्ग पोलीस विभागातील सहायता केंद्र सुरू करण्याची मंजुरी मागेच मिळाली होती. त्यात सहाय्यक फौजदार-1, पोलीस हवालदार-6 आणि पोलीस शिपाई-23 अशी 30 पोलीस अंमलदांची पदे मंजुर आहे. सर्वोच्च न्यायालयाने उच्चस्तरीय समितीची स्थापना केली असून राज्यातील रस्ते आणि त्यावर होणाऱ्या अपघातांच्या संख्येवर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीकोणातून सर्व रिक्त पदे भरण्यासंदर्भात निर्देश दिलेले आहेत. पोलीस अंमलदारांच्या रिक्तपदांमुळे महामार्गावर होणाऱ्या अपघातांमधील अपघातग्रस्तांना मदत करणे, वाहतुक सुरळीत करणे, तसेच दैनंदिन कामकाज पार पाडणे शक्य होत असते. यासाठी नांदेड पोलीस अधिक्षकांनी महामार्ग पोलीस सहाय्यता केंद्र देगलूरसाठी 1:3 प्रमाणे या विभागात काम करण्यासाठी पात्र असलेल्या इच्छूक पोलीस अंमलदांचा सेवा तपशील ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या तारखेपर्यंत पाठवायचा आहे.
महामार्ग सुरक्षा केंद्र देगलूरसाठी वाहतुक पोलीस महासंचालकांनी मागीतली इच्छूक पोलीस अंमलदारांची यादी