नांदेड(प्रतिनिधी)-12 सप्टेंबर रोजी दाखल झालेल्या एका खंडणी प्रकरणात वजिराबाद पोलीसांशी अत्यंत घनिष्ठ संबंध असणारा पवन जगदीश बोरा आजपर्यंत तरी पोलीसांना सापडला नाही. त्या अगोदर 30 ऑगस्ट रोजी दाखल झालेल्या गुन्ह्यात वजिराबाद पोलीसांनी त्याला पकडले होते तेंव्हा तो कोठे बसलेला होता आणि त्याच्यासोबत कोण होते हा पण एक नवीन विषय समोर आला आहे.
माहिती अधिकार या कायद्याचा वापर करून समाजाला सळोकी पळो करून सोडणाऱ्या पवन जगदीश बोराने अत्यंत छोट्याशा कालखंडात स्वत:साठी पिस्तुल पण प्राप्त केले. या पिस्तुलचा अहवाल पोलीस निरिक्षकाच्या नावावर करीता अशी खून करून कोणी तरी तिसऱ्यानेच ती स्वाक्षरी केली होती असे अजब प्रकार या वजिराबाद पोलीस ठाण्यात घडले आहेत. अनेकांना माजी तक्रार करतोस काय जा वजिराबाद पोलीस ठाण्यात तक्रार कर असे पवन जगदीश बोरा सांगत असे हे नामांकित व्यक्तीमत्व सध्या मात्र वजिराबाद पोलीसांना सापडत नाहीत. ऑगस्टमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यात त्याला अटक झाली होती. त्याला वैद्यकीय उपचारासाठी दाखल करावे लागले होते. अखेर न्यायालयाने पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला जामीन दिला होता.
त्यानंतर दि.12 सप्टेंबर रोजी ओमप्रकाश तापडीया यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पुन्हा एकदा नवीन खंडणीचा गुन्हा क्रमांक 327/2022 दाखल झाला. या गुन्ह्यात पवन बोराचा मामा गोपाल तिवारीला अटक झाली होती. न्यायालयाने त्याला दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे. पण पवन बोराला शोधण्यात वजिराबाद पोलीसांना आजपर्यंत यश आले नाही. अनेक खंडणीप्रकरणात अटक झाली. जामीन झाली की, पुन्हा पवन जगदीश बोराचा मुक्काम वजिराबाद पोलीस ठाण्यातच असतो असे अनेक सीसीटीव्ही फुटेज वजिराबाद पोलीस ठाण्यातच उपलब्ध आहेत. म्हणजे वजिराबाद पोलीस ठाण्याशी पवन बोराचे अगदी जवळच नाते आहे काय? असा प्रश्न पवन बोराच्या वजिराबाद पोलीस ठाण्यातील वास्तव्यामुळे वाटतो. बहुदा वजिराबाद पोलीस ठाण्यातील काही पोलीसांसोबत त्यांचे असे घनिष्ठ संबंध आहे की, त्यामुळे पवन बोरा बहुदा वजिराबाद पोलीसांना सापडत नसेल.