भोकर-किनवट राष्ट्रीय महामार्गावर अपघातात सहा जणांचा मृत्यू

नांदेड(प्रतिनिधी)- सोनारी-करंजी रस्त्यावर ट्रक आणि आयचर या दोन गाड्यांचा समोरासमोर अपघात झाला. दोन्ही गाड्या एक दुसर्‍याला एवढ्या जोरदारपणे धडकल्या की त्यात सहा जण जागीच ठार झाले आहेत.

भोकर-किनवट राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या सोनारी फाटा ते करंजी या रस्त्यावर आज सायंकाळी ७.४५ वाजेच्यादरम्यान एक ट्रक आणि आयचर या दोन एक-दुसर्‍यावर समोरासमोर धडकल्या. धडक एवढी जोरदार होती की, दोन्ही गाड्यांच्या समोरचे भाग चेंदा-मेंदा झाले आहेत. प्राप्त झालेल्या माहितीनुसार सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. वृत्त लिहीपर्यंत सरसम प्राथमिक आरोग्य केंद्रात जखमींवर उपचार सुरू होते. जखमींमध्ये पाच जणांची परिस्थिती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. त्यांना नांदेडला हलविले जाणार आहे, असे सांगण्यात आले. मयतांमध्ये जास्त करून बिहारी कामगार आहेत, असे सांगण्यात आले. पोलीस विभागाने त्वरीत प्रभावाने घटनास्थळी धाव घेऊन जखमींवर उपचारासह इतर मदतीची कार्यवाही केली. अनेक सर्वसामान्य नागरिकांनी सुद्धा घडलेल्या प्रकारात आपली जबाबदारी समजून मदत केली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *