नूतन बस स्थानक प्रमुख यासीन खान रुजू

नांदेड,(प्रतिनिधी)- गेल्या सहा महिन्यापासून रिक्त असलेल्या बस स्थानक प्रमुखपदी आज यासीन खान यांनी पदभार स्वीकारला. यापूर्वी ते भोकर येथे वाहतूक निरीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांना पदोन्नती देत नांदेड येथे नियुक्ती देण्यात आली आहे. यावेळी त्यांच्यासोबत प्रशिक्षणार्थी वाहतूक निरीक्षक विशाल निवडुंगे हे ही उपस्थित होते.
                कार्यभार स्वीकारतात त्यांनी बसस्थानकातील तक्रारींकडे लक्ष देत तात्काळ साफसफाई व दोन हॅलोजन लॅम्प लावण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांनी या सोबतच प्रवाशांच्या अडचणी दूर करताना कार्यभार स्वीकारलेल्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयीन वेळेत हजर होण्यासाठी होणारी बसची येणारी अडचण तात्काळ दूर करून सर्व काही दोन दिवसात सुरळीत होईल असे आश्वासन दिले. यावेळी बस स्थानकातील कर्मचारी दीपक मुदिराज, राजेश कांबळे, जगन्नाथ ढगे, राजेंद्र कुमार निळेकर तसेच विश्वासू प्रवासी संघटनेचे अध्यक्ष  शंकरराव नांदेडकर,इंजि हरजिंदरसिंघ संधू व रमाकांत घोणसीकर  यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *