नांदेड(प्रतिनिधी)-घरगुती गॅस सिलेंडरचा वापर करून चार चाकी वाहनांमध्ये गॅस भरण्याचा एक नवीन धंदा शहरात मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे. शहरात सुरू असणाऱ्या या धंद्याकडे लक्ष देण्यासाठी प्रशासनातील अधिकाऱ्यांना बिलकुल वेळ मिळत नाही अशा स्वरुपाचा हा कारभार सध्या सुरू आहे.
कमी मेहनतीत जास्तीत जास्त पैसे कमीत कमी वेळात कमावण्याचा एक ट्रेंड आहे. यासाठी वाटेल ते करायला मंडळी तयार असतात. त्यात वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे कारभार सुरू आहेत. परंतू काही जणांकडे जाणीव पुर्वक दुर्लक्ष केले जाते. काही जणांना असे अवैध काम करण्याची संधी दिली जाते असाच प्रयत्न सार्वजनिक रित्या दिसतो.
चार चाकी गाड्यांच्या इंधनांमध्ये सीएनजी हा एक प्रकार आहे. कायदेशीर सीएनजी आजच्या परिस्थितीत जवळपास 90 रुपये किलो दराने मिळतो. घरगुती गॅस सिलेंडरमधील गॅस चार चाकी वाहनाचे इंधन म्हणून भरण्याची एक नवीन पध्दत सुरु आहे. नांदेड शहरात आणि जिल्ह्यात अनेक सीएनजी गाड्या आहेत. परंतू कायद्याशिर रित्या सीएनजी भरण्याचा पंप मात्र जास्त संख्येत उपलब्ध नसल्याची परिस्थिती आहे. नेमका याच परिस्थिती फायदा घरगुती सिलेंडर वाहनामध्ये इंधन म्हणून भरण्यासाठी वापरणाऱ्यांनी केला. नांदेड शहरात आणि जिल्ह्यात सुध्दा अनेक ठिकाणी असे बेकायदेशीर सीएनजी पंप उपलब्ध आहेत. घरगुती गॅस सिलेंडरला पध्दतशिरपणे सीएनजी पंपाप्रमाणे यंत्रसामुग्री तयार करून वाहनांमध्ये घरगुती गॅस भरून देण्याचा एक नवीन बेकायदेशीर व्यवसाय सुरू झालेला आहे. प्रशासकीय अधिकारी याकडे कशा पध्दतीने बघतात हे प्रत्येकाच्या दृष्टीकोणावर अवलंबून आहे.
शहरात व जिल्ह्यात अनेक ठिकाणी घरगुती गॅस वाहनांमध्ये भरण्याचे रॅकेट