नांदेड(प्रतिनिधी)-26 सप्टेंबर रोजी रात्री काळीजी टेकडी येथून चोरण्यात आलेला 2 लाख 30 हजार रुपये किंमतीचा ऍटो वजिराबाद पथकातील गुन्हे शोध पथकाने काही तासातच जप्त करून उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
दि.26 सप्टेंबर रोजी रात्री काळीजी टेकडी येथून एम.एच.26 बी.डी.2933 हा चोरीला गेला होता. त्याबद्दल वजिराबाद पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 379 नुसार गुन्हा क्रमांक 340/2022 दाखल झाला होता. शहर उपविभागाचे पोलीस उपअधिक्षक चंद्रसेन देशमुख यांच्या मार्गदर्शनात वजिराबाद गुन्हे शोध पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरिक्षक संजय निलपत्रेवार, पोलीस अंमलदार गजानन किडे, मनोज परदेशी, शरदचंद्र चावरे, विजयकुमार नंदे, संतोष बेल्लूरोड, शेख इमरान, रमेश सुर्यवंशी, व्यंकट गंगुलवार, बालाजी कदम, सचिन वालेकर यांनी जुना मोंढा भागातील मनोज शंकरराव पतंगे यास ताब्यात घेतले. त्याने ऍटो क्रमांक 2933 आपल्या साथीदारांसह चोरी केल्याचे कबुल केले आहे. घटना घडताच काही तासात चोरीचा मुद्देमाल जप्त करणाऱ्या वजिराबादच्या गुन्हे शोध पथकाचे पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, पोलीस उपअधिक्षक चंद्रसेन देशमुख यंानी कौतुक केले आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस अंमलदार संतोष राठोड हे करीत आहेत. आज ऍटो चोर मनोज शंकरराव पतंगे यासह पोलीस अंमलदार संतोष राठोड यांनी न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी केली होती. ती न्यायालयाने मंजुर केली आहे.
वजिराबाद पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने चोरी झालेला ऍटो काही तासातच पकडला