कुंडलवाडी (प्रतिनिधी)- कुंडलवाडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक करीमखान पठाण काही कारणामुळे यांची तडकाफडकी बदली नांदेड येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात करण्यात आल्यामुळे कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे तात्पुरता चार्ज धर्माबादचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवप्रसाद कत्ते यांच्याकडे सोपविण्यात आला होता. पण आता नांदेड येथील ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गेल्या तीन वर्षांपासून कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वजीत कासले यांची दि.२८सप्टेंबर २०२२ रोजी नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्या आदेशानुसार कुंडलवाडी पोलीस ठाण्यात बदली करण्यात आल्यामुळे त्यांनी दि.२८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७:३० वाजताच्या सुमारास ताबडतोब कुंडलवाडी पोलीस ठाण्यात उपस्थित राहुन आपला पदभार स्विकारले आहे.
Related Posts
जुन्या भांडणाच्या वादातून मंडगी येथे खून
नांदेड(प्रतिनिधी)-मौजे मंडगी ता.देगलूर येथे एका 38 वर्षीय व्यक्तीचा खून पुर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरुन करण्यात आला आहे. देगलूर पोलीसांनी दोन जणांविरुध्द…
अनुकंपा धारकांची सामायिक जेष्ठता यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द
नांदेड (जिमाका)- जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावर 22 ऑगस्ट 2005 ते 30 एप्रिल 2023 पर्यतची वर्ग-3 व वर्ग-4 अनुकंपाधारकांची अंतीम सामायिक जेष्ठता…
जबरी चोरीतील फरार आरोपी पकडून स्थागुशाने 20 हजार रुपये रोख जप्त केले
नांदेड(प्रतिनिधी)-सप्टेंबरमध्ये लिंबगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या जबरी चोरी प्रकरणातील एका फरार आरोपीला पकडून स्थानिक गुन्हा शाखेने त्याच्याकडून 20 हजार रुपये…