मनपा आयुक्त डॉ.भगवंतराव पाटील; जिल्हाधिकारी अभिजित राऊत
नांदेड(प्रतिनिधी)- राज्य भरात शासनाने 44 भारतीय प्रशासनिक अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत.नांदेड महानगरपालिाकेच्या आयुक्त डॉ.सुनिल लहाने यांच्या जागी डॉ.भगवंतराव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भगवंतराव पाटील रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत. परंतू लहाने यांची बदली कोठे झाली हे या ा44 लोकांच्या यादीत नमुद नाही. नांदेड जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदावरा अभिजित राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अभिजित राऊत हे सध्या जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत.
महाराष्ट्राचे प्रधान सचिव(सेवा) डॉ.राजगोपाल देवरा यांच्या स्वाक्षरीने 44 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात मुख्यत्वे नांदेड मनपा आयुक्त डॉ.सुनिल लहाने यांच्या जागी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉ.भगवंतराव पाटील यांना पाठवले आहे. तसेच जळगावचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना नांदेडच्या जिल्हाधिकारी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
इतर 42 बदल्यांमध्ये पुढील नावे आहेत. त्यांची नवीन नियुक्ती कंसात लिहिली आहे. श्रीमती लिना बनसोड-मुख्य कार्यकारी अधिकारी नाशिक (अतिरिक्त आयुक्त आदिवासी विकास महामंडळ ठाणे), विवेश जॉन्सन-सहाय्यक जिल्हाधिकारी पांढरकौडा (मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर), डॉ.रामा स्वामी-मुंबई(संचालक स्किल डेव्हलपमेंट), डॉ.हर्षदिपक कांबळे-औद्योगिक विकास संचालक (प्रिन्सीपल सचिव मंत्रालय), श्रीमती जयश्री भोज-कार्यकारी संचालक पर्यटन(कार्यकारी संचालक आयटी), परिमलसिंह-फुड ऍन्ड ड्रग्स(कार्यकारी संचालक कृषी संजीवनी मुंबई), ए.आर.काळे-संचालक महानंद (संचालाक फुड ऍन्ड ड्रग्स), राजेश नेव्हरकर-जिल्हाधिकारी ठाणे(मनपा आयुक्त नवी मुंबई), अभिजित बांगर-मनपा आयुक्त नवी मुंबई (मनपा आयुक्त ठाणे), डॉ.विपीन शर्मा-मनपा आयुक्त ठाणे (कार्यकारी अधिकारी एमआयडीसी मुंबई), निलेश घंटे-मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. औरंगाबाद(एस.आर.ए. पुणे), सौरभ विजय-सचिव वैद्यकीय शिक्षण (सचिव कृषी आणि पर्यटन), मिलिंद बोरीकर-संचालक पर्यटन(मुख्याधिकारी एच.एस.जी.), अविनाश ढाकणे-संचालक वाहतूक(कार्यकारी संचालक एम.एस.फिल्म), संजय कंधारे-कार्यकारी संचालक (सचिव जन आरोग्य), डॉ.अनबालागन-मुख्यकार्यकारी अधिकारी औद्योगिक वसाहत (कार्यकारी संचालक वीज उत्पादन), दिपक कपूर-उपाध्यक्ष विमानतळ(अतिरिक्त मुख्य सचिव पाणी व्यवस्थापन), श्रीमती वल्सा नायर-सचिव पर्यटना(सचिव घरे विकास मंत्रालय), श्रीमती मनिषा पाटनकर-म्हैसकर- सचिव पर्यावरण(मुख्य प्रोटोकॉल अधिकारी मंत्रालय), मिलिंद म्हैसकर-सचिव घरे विकास (प्रशासनिक विभाग मंत्रालय), प्रविण दराडे-कार्यकारी संचालक एमएसएसआयडीसी(सदस्य सचिव महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ), तुकाराम मुंढे-नागरी हक्क संरक्षण(आयुक्त एफडब्ल्यू), अनुपकुमार यादव-जनजाती विकास विभाग मंत्रालय (सचिव अल्पसंख्याक विभाग), डॉ.प्रदीपकुमार व्यास-अतिरिक्त सचिव जन आरोग्य (मुख्य सचिव जनजाती विकास), अश्र्विनी जोशी-असंघटीत कामगार विकास विभाग (वैद्यकिय शिक्षण), दिपेंद्रसिंह कुशवाह-आयुक्त स्किल डेव्हलपमेंट(विकास आयुक्त उद्योग), अशोक सिनगारे-प्रदुषण नियंत्रण मंडळ(जिल्हाधिकारी ठाणे), श्रीमती श्रध्दा जोशी-सचिव महिला आयोग (कार्यकारी संचालक पर्यटन विकास), मनुज जिंदल-मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.जालना (मुख्य कायृकारी अधिकारी ठाणे जि.प.), सचिन ओंबासे-मुख्य कार्यकारी अधिकारी वर्धा(जिल्हाधिकारी उस्मानाबाद), अमन मित्तल-मनपा आयुक्त लातूर (जिल्हाधिकारी जळगाव), राजेश पाटील-प्रतिक्षेत (सैनिक कल्याण विभाग पुणे), अमिषा मित्तल-सहाय्यक जिल्हाधिकारी ढाहाणू(मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.नाशिक), किर्थी पुजार -सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट (मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.रत्नागिरी)ा, रोहन घुगे-सहाय्यक जिल्हाधिकारी चंद्रपूर (मुख्य कार्यकारी अधिकारी वर्धा), विकास मिणा-सहाय्यक जिल्हाधिकारी(मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद औरंगाबाद), श्रीमती वर्षा मिणा-सहाय्यक जिल्हाधिकारी नाशिक (मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जालना), के.व्ही. जाधव -प्रतिक्षेत(सहाय्यक कार्यकारी अधिकारी एमएसआरडीसी), कस्तुभ दिवेगावकर-जिल्हाधिकारी उस्मानाबाद(संचालक बाळासाहेब ठाकरे कृषी व्यापार), राजेंद्र निंबाळकर-मुख्य कार्यकारी अधिकारी झोपडपट्टी विकास(कार्यकारी संचालक एमएसएसआयडीसी), विवेक भिमनवार-कार्यकारी संचालक फिल्म(वाहतुक आयुक्त), देवेंद्रसिंह-संचालक एमएससीईआरटी पुणे (जिल्हाधिकारी रत्नागिरी).
नांदेडला नवीन मनपा आयुक्त आणि नवीन जिल्हाधिकारी