नांदेड(प्रतिनिधी)-पत्नीला त्रास दिल्याप्रकरणी 8 वर्षानंतर एका 42 वर्षीय व्यक्तीला मुख्य न्यायदंडाधिकारी किर्ती जैन देसरडा यांनी सहा महिने साधा कारावास आणि 2 हजार रुपये रोख दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
सन 2014 मध्ये शेख जमीन शेख मन्सूर (42) रा.खडकपुरा याच्याविरुध्द त्याच्या पत्नीने तक्रार दिल्यावरुन वजिराबाद पोलीसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 498(अ) नुसार गुन्हा क्रमांक 24/2014 दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक दी.के.डोम्पल्ले यांनी केला आणि शेख जमीर शेख मन्सुर विरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. न्यायालयात सरकारी वकील ऍड.एस.डी.जोहिरे यांनी सरकारपक्षाची बाजू मांडली. उपलब्ध पुराव्याच्या आधारावर न्यायालयाने नियमित फौजदारी खटला क्रमांक 439/2014 मध्ये पत्नीला त्रास देणारा शेख जमीन शेख मन्सुर यास शिक्षा ठोठावली आहे. पोलीसांच्यावतीने पैरवी अधिकारी म्हणून पोलीस अंमलदार बालाजी लामतुरे आणि वच्छेवार यांनी काम केले.
पत्नीला त्रास दिल्याप्रकरणी आठ वर्षानंतर न्यायालयाने ठोठावली शिक्षा