नांदेड(प्रतिनिधी)-एसबीआय(स्टेट बॅंक ऑफ इंडिया) या बॅंकेत 37 वर्षांची सेवा विविध पदांवर देत सौ.अंजली प्रकाश जोशी 30 सप्टेंबर रोजी कृतकृत्य भावनेतून सेवानिवृत्त झाल्या.
37 वर्षापुर्वी एसबीआयच्या मलकापूर शाखेत रोख लिपीक या पदावर रुजू झालेल्या अंजली जोशी यांनी आपली गुणवत्ता आणि कार्यक्षमता यांच्या जोरावर विविध पदोन्नती घेतल्या. सेवानिवृत्त होत असतांना त्या रोख अधिकारी होत्या. अंजली जोशी यांना मालेगाव शाखेच्यावतीने हार्दिक निरोप देण्यात आला. निरोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी शाखा प्रबंधक मंगेश खापेकर होते. या समारंभास सेवानिवृत्त सहमहाप्रबंधक सायलू दासरवाड, एसबीआय ऍम्प्लॉईज युनियनच्या क्षेत्रीय सचिव विजयालक्ष्मी अय्यर, पेन्शनर संघटनेचे अध्यक्ष आडे, चंदू सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
शाखा प्रबंधक महेश खापकर म्हणाले अंजलीताईंनी अत्यंत सचोटीने आणि निष्ठेने बॅंकेची सेवा करून येणाऱ्या पिढीला उत्कृष्ट संदेश दिला आहे. आपल्या सत्काराला निरोपाचे उत्तर देतांना सौ.अंजली जोशी म्हणाल्या. बॅंकेतील माझ्या सहकाऱ्यांनी वेळोवेळी मला केलेले सहाय्य आणि वरिष्ठांनी केलेले मार्गदर्शन माझ्या यशाचे रहस्य आहे. माझे पती प्रकाश जोशी हे काही दिवसांपूर्वीच एसबीआय बॅंकेतून सेवानिवृत्त झाले. त्यांचे अमोल मार्गदर्शन मला होते. या कार्यक्रमाचे सुत्र संचालन आदित्य सेनगावकर यांनी केले. कार्यक्रमानंतर खाजगीत बोलतांना अंजली जोशी म्हणाल्या सध्या तर मी काही नियोजन केले नाही पण येणारी काही वर्ष मी उनाडवर्ष म्हणून साजरी करणार आहे. यात मी मनसोक्त फिरणार आहे. जे आजपर्यंत करू शकले नाही ते ते सर्व करणार आहे.
अंजली जोशी एसबीआयतून सेवानिवृत्त