
नांदेड(प्रतिनिधी)-यंदा पावसाने सरासरीपेक्षा जास्त पाणी दिल्यामुळे काही शेतींचे नुकसान झाले, काही जागी तण वाढले. यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातील जनरेटर तणांच्या विळख्यात सापडले आहे. त्यांचे नुकसान झाले तर त्याचा जबाबदार मात्र कोण ? हे काही आज सांगता येणार नाही.
जिल्ह्यात यंदा पावसाने सरासरीपेक्षा जास्त पाणी दिले. त्यामुळे अनेक जागी तणांची वाढ झाली, काही वेली वाढल्या आणि त्याचा वाईट परिणाम आसपास असणाऱ्या साहित्यावर सुरू झाला आहे. इतर साहित्यांचा विषय नाही. पण ज्यांच्या हातात जिल्हा असतो, जिल्ह्याचे रक्षण आणि सुरक्षा करण्याची जबाबदारी ज्या जिल्हाधिकाऱ्यांवर असते. त्या जिल्हाधिकारी कार्यालयात सुध्दा अनावश्यक वाढलेल्या तणांनी तेेथे असलेल्या जनरेटरांना धोका निर्माण केला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात सहजपणे फिरतांना तीन जनरेटर दिसतात. त्याच्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत. ज्यामुळे विद्युत खंडीत असलेल त्यावेळी त्या जनरेटरमधून निर्माण होणारा विद्युत पुरवठा कार्यालयाचे सर्व कामकाज चालवतो. जिल्हाधिकारी कार्यालयातील जनरेटरांना अनावश्यक तणांनी आणि वेलींनी घेरले आहे. यामध्ये पाणी असते. म्हणून त्याचा परिणाम जनरेटरच्या लोखंडी सामानावर होणार आहे आणि ते सामान सडणार आहे. मग त्यातून विद्युत पुरवठा होणार नाही आणि कार्यालयाचे कामकाज ठप्प होईल अशा परिस्थितीत या जनरेटरांची देखरेख करणे अत्यंत आवश्यक आहे. परंतू आजच्या परिस्थितीत असे काही घडत नाही त्यामुळे अनावश्यक तणांनी जनरेटरांना होणाऱ्या नुकसानीचा जबाबदार कोण? आणि त्याची जबाबदारी कोणाची या प्रश्नाचे उत्तर अवघड आहे.
