नांदेड(प्रतिनिधी)- पोलीस अधिक्षक कार्यालयात महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री या महापुरूषांची जयंती साजरी करण्यात आली.
पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांनी दोन्ही महापुरूषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी नियंत्रण कक्षातील पोलीस निरिक्षक अवधुत कुशे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्यासह कार्यालयातील अनेक पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार, मंत्रालयीन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी हजर होते. या कार्यक्रमाचे नियोजन पोलीस उपनिरिक्षक उत्तम वाघमारे आणि संजय सांगवीकर, विनोद भंडारे यांनी केले.
पोलीस अधिक्षक कार्यालयात महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांना अभिवादन