नांदेड(प्रतिनिधी)-सिंधी ता.उमरी येथे पतसंस्थेवर दरोडा टाकून 2 लाख 2 हजार 590 रुपये घेवून पळालेल्या दरोडेखोरांपैकी एकाला स्थानिक गुन्हा शाखेच्या कर्तव्यदक्ष पथकाने आज पहाटे 3.35 वाजता नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोळीबार करून पकडले आहे. दरोड्यातील सर्व रक्कम सापडल्याची खात्रीलायक माहिती आहे. आरोपीला पायावर गोळी लागली आहे. त्याच्यावर सध्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
काल दि.1 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजेच्यासुमारास सिंधी ता.उमरी येथे मोरातीराव कवळे गुरूजी यांच्या व्यंकटराव कवळे पाटील यांच्या बिगर शेतीवर दरोडा पडला. दरोडेखोरांनी तलवारीच्या धाकावर 2 लाख 2 हजार 590 रुपये लुटून नेले होते. हा घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. गावकऱ्यांनी एकाला दरोडेखोराला स्वत: पकडले. त्याचे नाव मनजितसिंघ किशनसिंघ सिरपल्लीवाले (30) असे आहे. उर्वरीत दरोडेखार पळून गेले होते. सीसीटीव्हीमध्ये सहा दरोडेखोर दिसतात. पण काही जण सांगतात की, दरोडेखोर सात होते. त्यापैकी एकाला सिंधी येथील गावकऱ्यांनी पकडले.
इतर फरार झाले होते. काल रात्री स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक पांडूरंग माने, पोलीस अंमलदार राजू सीटीकर,संजीव जिंकलवार, मोतीराम पवार आणि हेमंत बिचकेवार हे गस्त करत असतांना पुणेगावकडून येणाऱ्या रस्त्यावर पहाटे 3.35 वाजता एका दुचाकीला थांबवण्याचा प्रयत्न केला असता ते थांबले नाहीत उलट पोलीसांवर हल्ला केला. यावेळी त्या दोघांपैकी एक पळून जाण्यात यशस्वी झाला. पण दुसरा पोलीस पथकाने गोळीबार करून पकडला आहे. पकडलेला गुन्हेगार बालाजी संभाजी महाशेट्टे (21) रा.धनज ता.मुदखेड याच्यावर पायावर गोळी लागली आहे. त्याच्यावर सध्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. खात्रीलायक सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सिंधी येथून लुटलेली सर्व रक्कम पोलीसांना सापडली आहे. परंतू या बाबीला कोणी दुजोरा देत नाही.
दरोडा घडल्यानंतर 12 तासात दरोड्यातील रक्कमेसह आरोपी पकडणाऱ्या पोलीस पथकाचे पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी, पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, विजय कबाडे, गृह पोलीस उपअधिक्षक अश्र्विनी जगताप आदींनी कौतुक केले आहे.
आधी लगीन कोंडाण्याचे; दुसऱ्यांदा
स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या एका पुतण्याचे निधन कालच दि.1 ऑक्टोबर रोजी झाले होते. ते आपल्या गावाकडे गेले होते. दुपारी 2 वाजता दरोडा घडला. आपल्या पुतण्याच्या अंतिम कार्यक्रमाला लवकरात लवकर संपवून पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर नांदेडकडे रवाना झाले आणि आपल्या सहकारी अधिकाऱ्यांना सुचना देत होते. त्यांच्या सहकारी अधिकाऱ्यांनी सुध्दा आपल्या साहेबांच्या हाकेला प्रतिसाद दिला आणि एक दरोडेखोर रक्कमेसह गोळीबार करून पकडला.
या अगोदर सुध्दा असेच एकदा घडले होते आपली प्रिय सुपूत्री दवाखान्यात उपचार घेत असतांना द्वारकादास चिखलीकर यांनी तिच्या दवाखान्यातील कामाला महत्व न देता आपल्या पोलीस जबाबदारीला महत्व दिले होते आणि एका खून प्रकरणातील 9 दरोडेखोरांना गजाआड केले होते. आधी लगीन कोंडाण्याचे मग रायबाचे या ऐतिहासीक शब्द प्रयोगाला चिखलीकरांनी दुसऱ्यांदा प्रत्यक्षात आणले.
स्थानिक गुन्हा शाखेचे स्वप्न
काही महिन्यांमध्ये द्वारकादास चिखलीकरांना स्थानिक गुन्हा शाखेत तीन वर्ष पुर्ण होतील. मागील खंडीभर वर्षांमध्ये एवढा कार्यकाळ पुर्ण करणारा हा पहिलाच अधिकारी आहे. त्यामुळे लवकरच आपली वर्णी या खुर्चीवर लागावी यासाठी अनेकांनी स्वप्न पाहिली. परंतू आपल्यात त्या खुर्चीसाठी आवश्यक असलेल्या पात्रता मात्र तपासण्याची इच्छा स्वप्न पाहणाऱ्यांची नाही. स्वप्न उगीच पुर्ण होत नसतात. त्यांच्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. तेंव्हाच स्वप्न पुर्ण होतात. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक गुन्हा शाखेने एका दरोडेखोराला पकडल्यानंतर त्यातून काय बोध घ्यायला हवा हा एक मोठा शोध विषय आहे.
संबंधीत बातमी…
https://vastavnewslive.com/2022/10/01/कॉंग्रेस-नेते-कवळे-गुरूज/