नांदेड(प्रतिनिधी)- पोलीस विभागातील पोलीस शिपाई ते पोलीस निरिक्षक यांना एका कॅलेंडर वर्षात 20 नैमित्तीक रजा मिळणार आहेत. यावर आज नवरात्र अष्टमीच्या दिवशी शासनाने शिक्कामोर्तब करून शासन निर्णय जाहीर केला आहे. या शासन निर्णयावर गृहविभागाचे अपर मुख्य सचिव शाम तागडे यांची डिजिटल स्वाक्षरी आहे.
पाचव्या वेतन आयोगातील शिफारसीनुसार राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना एका कॅलेंडर वर्षात 12 ऐवजी आठ रजा मंजुर करण्याचा निर्णय घेतला होता. पण पोलीसांना 12 नैमित्तीक रजा मिळत होत्या. पण पोलीस विभागातील व्यक्ती दरदिवशी 8.30 तासांपेक्षा अधिक वेळ थांबून कर्तव्यपार पाडत असतो. ही जबाबदारी पार पाडतांना विविध सण, उत्सवांच्या अनुषंगाने असलेले बंदोबस्त तसेच व्हीआयपी व अन्य बंदोबस्तांमुळे एकूण कर्तव्य कालावधी अपरिहार्यपणे वाढत जातो. याबाबींना लक्षात घेवून पोलीसांच्या शारिरीक व मानसिक आरोग्य तसेच क्षमतेवर परिणाम होई नये म्हणून त्यांचे कौटुंबिक स्वास्थ योग्य राहावे म्हणून पोलीस शिपाई ते पोलीस निरिक्षक या पदांच्या व्यक्तींना आता 12 दिवसांऐवजी एका कॅलेंडर वर्षात 20 दिवस नैमितीक रजा विशेष बाब म्हणून अनुज्ञेय करण्यात आली आहे.
माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी सुध्दा या रजा वाढवून मिळण्यासाठी शासनदरबारी भरपूर पाठपुरावा केला होता. शासनाने आज दि.3 ऑक्टोबर 2022, नवरात्र अष्टमी रोजी हा शासन निर्णय घेतला आहे. तो शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केला आहे. या शासन निर्णयाचा संकेतांक क्रमांक 202210031310387529 असा आहे.
पोलीसांना आता 12 ऐवजी 20 नैमित्तीक रजा मिळणार ; शासनाने आज घेतला निर्णय