नांदेड,(प्रतिनिधी)-काल विजयादशमी दिनी समाजाने रावणाचे दहन करून वाईट प्रवृत्तींना अग्नीच्या हाती देऊन त्यांना पूर्ण पणे जाळून जाळून टाकल्या. पण त्या वाईट परिस्थिती संपल्या काय? नाही कारण आम्ही प्रतीकात्मक दहन करून एक संदेश दिला पण तो आपल्या जीवनात कधी प्रत्यक्षात आणला नाही. आज दुर्गा देवीचे विसर्जन होणार आहे त्या शक्ती वर आधारित आम्ही जीवन जगतो. त्या शक्ती उत्कृष्ट कामासाठी वापरल्यास गेल्या पाहिजे आहे पण त्याचा सुद्धा आम्ही नेहमीच दुरुपयोग करतो. नांदेड जिल्हा पोलीस दलामध्ये आता तरी या दोन महोत्सवाच्या नंतर सुधारणा व्हावी या अपेक्षेने वास्तव न्यूज लाईव्हचा हा शब्द वाचकांसमोर मांडत आहे.आपल्या फायद्यासाठी इतरांच्या जीवनाची वाट लावून आपलेच उखळ पांढरे करण्याची प्रवृत्ती नांदेड जिल्हा पोलीस दलाने सन 2022 मध्ये तरी सोडून द्यावी अशी अपेक्षा आहे.
नांदेड जिल्हा पोलीस दलाने मागील काही वर्षांमध्ये अनेक घडामोडी पाहिल्या त्यात काम करत असताना अनेक पोलीस चुकीच्या मार्गांमध्ये गोवले गेले किंबहुना त्यांनी स्वतःच त्या मार्गांची वाट धरली आणि त्यातून पुढे जाताना आपले उखळ पांढरे करण्याची प्रवृत्ती पोलीस विभागात वाढली. पोलीस विभागात आपल्या जबाबदाऱ्या झटकण्याची वृत्ती जास्त जोर धरू लागली आणि त्यातून विविध प्रकारे आपला गल्ला भरण्याची प्रवृत्ती वाढली या प्रवृत्तीमुळे इतरांचे काय नुकसान त्यात होणार आहे याची जाणीव कोणीच ठेवली नाही. पोलीस विभागात कार्यरत असल्याने त्यांच्याकडे असलेल्या अधिकारांचा दुरुपयोग करून काहीजणांनी अतिरेक्यांशी संधान साधले त्यात बऱ्याच तपासणीनंतर आज एक पोलीस निरीक्षक मकोका कायद्याअंतर्गत तुरुंगात आहे. त्यावेळी काही पोलिस सुध्दा दोषी असतीलच पण काही कारणांनी ते वाचले. पोलीस अधिकारी बाहेर जिल्ह्यातून नांदेडला आलेला असतो तो सर्व कारभार नांदेड जिल्हा पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने चालवतो. नांदेडच्या कर्मचाऱ्यांमध्ये आपल्या पोलीस सेवेसह अनेक जुन्या शत्रुता असतात आणि त्या शत्रुतांचा उपयोग तो आपल्या पोलिसातील अधिकारांचा वापर करून आणि अधिकाऱ्यांना हाताशी धरून पूर्ण करून घेतो. हे करत असताना मी हे केले,मी ते केले,मीच करू शकतो, मलाच सर्व माहित आहे, सर्व अधिकारी माझेच ऐकतात, असा समज तो स्वतः तयार करतो किंवा त्याचे एजंट अशी परिस्थिती निर्माण करतात. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला असे वाटायला लागते की आम्हाला त्या एका व्यक्तीकडेच जावे लागेल तरच आमच्याकडे असणाऱ्या समस्या संपतील. तेव्हा ती सर्वसामान्य जनता त्या व्यक्तीच्या मागे धावते.मी नाही त्यातली असे म्हणत सर्वकाही तोच व्यक्ती करतो. परंतु लोकांना जे दिसते, सर्वसामान्य जनतेला जे पाहायला मिळते त्यात तो कुठेतरी भरपूर काही करत असतो. आणि सर्व काही हळुवारपणे आपल्या बुद्धीच्या आणि पोलीस शक्तीच्या जोरावर मागे दाबून टाकत असतो. या परिस्थितीमध्ये कधी त्याची वेळ येते तेव्हा मात्र तो आपल्या बचावासाठी भरपूर नाटक बाजी करतो. वेगवेगळ्या प्रकारे खोटे बोलतो आणि इतरांना उघडे पाडून मी खूप छान आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतो नव्हे तर तो यशस्वी होतो. वाट लागते त्या बिचाऱ्या सरळ माणसाची ज्याचा उपयोग तो करतोय.परंतु सत्य हे काही वेगळेच असते. सत्य जेव्हा त्या माणसाला कळते तेव्हा तो आपसूकच म्हणतो मला कधी कळेल हे.सत्य हे कडू आहे. जेव्हा ते सत्य समोर येते तेव्हा त्याची अवस्था मरणासन्न होते.
नांदेड जिल्ह्यात किंबहुना संपूर्ण समाजात अशा काही हळव्या मनाच्या व्यक्ती असतात त्यांना या नाटकरावाना ओळखता येत नाही. त्यामुळे त्यांनी अत्यंत निर्भेळ मनाने एखादी कृती केली तर त्या कृतीचा दुरुपयोग करणारी मंडळी सुद्धा या जगात आहे. नाटकबाजीला कंटाळून चांगल्यासाठी मला काम करायचे आहे, असे समजून कोणी व्यक्ती त्या नाटकबाजासाठी काही तर करू असा विचार करतो आणि स्वतः फसतो. अत्यंत साध्या पद्धतीने जगणाऱ्या त्या माणसाला त्या पोलिसांनी केलेली गद्दारी, त्याच्यासाठी आम्हीच तुझे बंधू आहोत,तूच आमचा मोठा बंधू आहेस हे दाखवण्याचा केलेल्या प्रयत्नातील सत्यता कळते. त्याला आपल्या संपर्कातील व्यक्तींनी केलेली गद्दारी पाहायला मिळते. तेव्हा पुन्हा ती खेळी कोणीतरी सूर्याची पिसाळाचीच असते हजारो वर्षांपासून सूर्याची पिसाळ यांचे वास्तव्य या जगाने पाहिलेले आहे.त्यांनी समाजात अनेक लोकांचे नुकसान केलेलेच आहे.आता मात्र
पण या जगात सूर्याजी पिसाळ संख्या समाजात वाढतच आहे. त्यातल्या त्यात पोलिस दलात सूर्याजी पिसाळसह मिर जाफर,मिर सादिक वृत्तीची मंडळी वाढली आहे. जगायचे आपल्याला आहे हे जगणे एवढेच सहज नसते याचा प्रत्यय जेव्हा त्या सरळ मार्गी व्यक्तीला येतो तेव्हा कवी सुरेश भटांचे वाक्य आठवते की, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते,शेवटी तुला घरच्यानीच जाळले आहे.
जिल्हा पोलीस दलात काम करणाऱ्या आणि आपल्या सेवा देणाऱ्या पोलिसांनी आम्ही सेवा करण्यासाठी आहोत. कोणाची लूट करण्यासाठी नाहीत. या मूळ विचाराचा विसर पडला आहे. जिल्ह्यात सेवा देण्यास आलेले अधिकारी त्यांचा उपयोग करतात आणि आपले गल्ले भरून घेतात आपला विहित कालखंड पूर्ण झाल्यानंतर जिल्हा सोडून जातात. परंतु नांदेड जिल्ह्याचे पुत्र असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना मात्र येथेच राहावे लागते आणि त्यातून पुन्हा नवीन समस्या तयार होतात .पोलीस दलात सेवा करताना आम्ही जनतेची सेवा करण्यासाठी जन्म घेतला आहे अधिकाऱ्यांची नाही याचा विसर जिल्हा पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना पडला आहे आणि त्यातूनच इमानदारी हा शब्द सेवेतून गहाळ होत चाललाय. हा गहाळ झालेला शब्द त्यांच्या स्वतःसाठी समाजासाठी आणि जनतेच्या भल्यासाठी अत्यंत त्रासदायक ठरत आहे. प्रत्येकाने आपली जबाबदारी काय आहे याची ओळख ठेवून जगण्यास सुरुवात केली तर या जीवनातील बहुतांश समस्या संपून जातील परंतु तसे घडत नाही आणि हीच दुर्दैवाची बाब आहे. नांदेड जिल्हा पोलीस दलात काही अधिकाऱ्यांनी चांगल्या चांगल्याना भारीचा दणका दिलेला आहे. जनता त्या दणक्यांची आठवण नेहमीच करत राहते आणि त्या अधिकाऱ्यांना याबद्दल धन्यवाद पण देते. परंतु फक्त आपल्या स्वार्थासाठी पोलीस नोकरी नांदेड जिल्ह्यातील पुत्रांनी आम्हीच या जगाचे करते आहोत ही भावना आपल्या स्वतःमधून वगळून आम्ही या जगात जन्माला होत त्याचे ऋण फेडण्यासाठी आम्हाला या समाजाची सेवा करणे बंधनकारक आहे ही एकच बाब लक्षात ठेवली तर मात्र बऱ्याच बाबी आपोआप सुधारल्या जातील ज्या लोकांना अशा प्रकारे चुकीची कामे करणारी मंडळी ओळखू येते त्यांनी त्या चुकीच्या माणसांपासून इतरांना सावध केले पाहिजे कोणी एक फसला काय आणि हजारो फसले काय फसवणूक हा एक शब्द खूप महत्वपूर्ण आहे. भारतीय संविधानाने दिलेल्या स्वातंत्र्यावर त्या फसवणुकीमुळे गदा येते आणि मी काही केले नाही अशी फक्त ओरड करून ही चुकीची मंडळी नेहमीच वरचढ ठरते. ज्या अधिकाऱ्यांना काही अधिकार प्राप्त झाले आहेत, काही मेहेरे नजर मिळाली त्यांनी सुद्धा आपल्या अधिकारांचा आणि आपल्यावर असलेल्या छत्रछायेचा योग्यच वापर करायला हवा नसता त्यांची सुद्धा कुठेतरी पातळी उघडी पडेल. ज्या ज्या जिल्ह्यात जातात असे अधिकारी त्या जिल्ह्यातील लोकांचा उपयोग करून आपला कार्यकाळ पूर्ण करताना आपली तुंबडी कशी भरली जाईल यावरच लक्ष ठेवतात. ते आपल्या कल्पनेत यशस्वी होतात पण ज्यांचा उपयोग करून तेथून तुंबडी भरली गेली त्या जागी काही त्यांचे दलाल असतात.काही माझ्या जिल्ह्यासाठी काम करणाऱ्या अधिकाऱ्याला मदत करणे ही आपली जबाबदारी समजून सहकार्य करतात त्यांची मात्र गोची होते. कधीकाळी दुसऱ्याच्या चुकांमुळे अनेकांना झालेला त्रास सर्वश्रुत आहे असे सांगतात ज्या रावणाचे दहन आपण कालच केले. त्या रावणाच्या जळण्याची वेळ सुद्धा त्याच्या बंधू मुळेच आली होती. आता घरचा बंधूच रावणासोबत असा करत असेल तर समाजात पोलीस विभागात राहून इतरांसाठी आपल्या अधिकारांचा उपयोग आणि आपली तुंबडी भरण्यासाठी, आपला कार्यकाळ चांगला जाण्यासाठी ज्यांनी ज्यांचा उपयोग केला त्यांची अवस्था मरणासन्न होईल वास्तव न्यूज लाईव्ह उल्लेखित करत आहे की आपल्याला काय चुकीचे करायचे आहे ते स्वतःच्या दमावर करा कुणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून तिसऱ्यावर गोळी झाडू नका जेणेकरून कधीकाळी ही सत्यता बाहेर येईल तेव्हा हा सर्व चुकीचा प्रकार करणाऱ्यांची मोठी पंचाईत होईल आणि तो उद्रेक या समाजात एक नवीन समस्या तयार करेल. म्हटले जात सत्य परेशान हो सकता है पर पराजित नही हेच सांगण्यासाठी वास्तव न्यूज लाईव्ह चा हा शाब्दिक प्रपंच आहे