दररोज रात्री 9 वाजता नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात हजेरी
नांदेड,(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत सन 2019 मध्ये झालेल्या एक खून प्रकरणात एका युवकाला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील न्यायमूर्ती आर. जी. अवचट यांनी जामीन मंजूर करताना या आरोपीने दररोज रात्री नऊ वाजता पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण येथे हजेरी लावावी असे आदेश दिले आहेत
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या बॉम्ब शोधक व नाशक पथक कार्यालयाजवळ एक खून झाला होता. यापूर्वी मारेकऱ्यांनी सरकारी रुग्णालयासमोर एका वैद्यकीय अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला केला होता. त्यानंतर बॉम्ब शोधक व नाशक पथक कार्यालयाजवळ जवळ थांबून मारेकऱ्यांनी एका काळ्या रंगाच्या गाडी चालक आणि मालक याची हत्या करून ती गाडी पळवली होती. त्या गाडीत जीपीएस सिस्टीम उपलब्ध असल्याने त्या गाडीला शोधणे पोलिसांना सहज झाले होते. त्यावेळी एका सहायक पोलीस निरीक्षकाने त्या गाडीची चावी आणून पोलीस अधीक्षकांना दिली होती. तत्पूर्वी पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वात त्या गाडीला सर्व कडून घेरण्यात आले होते. आणि आलेल्या परिस्थितीला कोणत्याही परिस्थितीत जिंकायचे आहे असे पोलीस पथकाने ठरवलेले होते. पण पोलीस अधीक्षकांना चोरलेल्या गाडीची चावी सहायक पोलीस निरीक्षकाने आणून दिल्यानंतर त्या ठिकाणी घडलेले भयंकर नाट्य आजही अनेक पोलिसांच्या स्मरणात आहे. याप्रकरणी त्या घटनेची संबंधित सुरेंद्रसिंघ उर्फ सुरज जगतसिंघ गाडीवाले या युवकाला अटक केली.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात तो गुन्हा क्रमांक 174/2019 भारतीय दंड संहितेच्या कलम 302, 307, 397, 398, 20 ब 34 भारतीय हत्यार कायदा आणि पुढे या गुन्ह्यात मकोका कायदा जोडला गेला.
सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे सुरजसिंघ उर्फ सुरज जगतसिंघ गाडीवाले यांच्यावतीने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जामीन अर्ज क्रमांक 897/2022 दाखल करण्यात आला. या प्रकरणात सुरज गाडीवाले यांच्यावतीने ऍड. एन. आय. देशमुख यांच्यावतीने ऍड. पूनम बोडके पाटील यांनी न्यायालयात सादरीकरण केले. युक्तिवाद ऐकून न्यायमूर्ती आर.जी.अवचट यांनी सुरज गाडीवालेला गुन्हा क्रमांक 174 74 2019 मध्ये जामीन मंजूर करताना सुरज गाडीवाले ने न्यायालयीन प्रक्रियेचा शेवट होईपर्यंत पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण येथे दररोज रात्री नऊ वाजता नऊ वाजता हजेरी लाभावी असे आदेशात लिहिले आहे