नांदेड (प्रतिनिधी)- महापालिकेत आज दि.06 ऑक्टोंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता स्थायी समिती सभापती किशोर स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सभा सपन्न झाली. आजच्या सभेत विषय पत्रिकेवरील एकुण 9 विषयावर चर्चा करुन सर्वानुमते सर्व विषय पारित करण्यात आले.
महापालिकेच्या आरोग्य विभागात कोरोना काळात विविध योजनेत महापालिकेच्या आस्थापनेवरील तात्पुरत्या सेवेत काम करणारे आरोग्य विभागातील कर्मचारी यांना रिक्त पादावर घेण्याची तात्काळ कार्यवाही करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव आजच्या आज पाठवा अशा सुचना सभापती किशोर स्वामी यांनी आस्थापना विभागास दिल्या. यात कामचुकारपणा करणा-या अधिकारी व कर्मचा यांवर कार्यवाही करण्यात येईल.
सभापती यांनी अनाधिकृत बांधाकामाबाबत माहिती घेऊन अनाधिकृत बांधकाम नियमात बसत असेल तर नियमित करा. यापुढे क्षेत्रीय कार्यालयात अनाधिकृत बांधकाम होत असल्याचे आढळुन आल्यास संबंधित क्षेत्रीय अधिका यावर गुन्हे दाखल करण्याच्या सुचना सभापती यांनी केल्या.
या बैठकीत शहरातील ब-याच ठिकाणी कचरा साचलेला असल्याच्या स. सदस्या कडुन व नागरिकांच्यावतीने तक्रारी येत आहेत. सध्या दिपावली हा मोठा सण आहे. स्वच्छता विभागाने साफसफाईकडे विशेष लक्ष देउन कचरा तात्काळ उचलण्याच्या सुचना करुन मुख्य जलवाहिन्यावर ब-याच ठिकाणी नळ गळती असुन मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत आहे. त्या गळत्या लवकरात लवकर दुरुस्त करुन घ्याव्यात. याबाबत सभापती यांनी सुचना दिल्या.
तसेच महादेव दाल मिल ते आनंदनगर चौक व कै. मा. डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या पुतळ्यापासुन ते भाग्यनगर चौकापर्यंतच्या रस्त्याचे लवकरात लवकर काम चालु होत असल्याचे सुचित केले.
या बैठकीस अति. आयुक्त गिरीश कदम, स्थायी समिती स. सदस्य विरेद्रसिंघ गाडीवाले, अ.हफीज, राजु काळे बालाजीराव जाधव, यांनी चर्चेत सहभाग नोंदविला. समिती सदस्य अ. अलीम खान स. सदस्या सुनंदा पाटील, कुरेशी रेहाना बेगम, फरहत सुलताना खुर्शिद अहमद, कदम ज्योती, यांच्यासह उपायुक्त निलेश सुकेवार, मुख्यलेखापरिक्षक टी.एल. भिसे, मुख्यलेखाधिकारी डॉ. जनार्दन पक्वान्ने, नगरसचीव अजीतपालसिंघ संधु व अधिकारी, विभागप्रमुख यांची उपस्थित होते.