नांदेड (प्रतिनिधी)- 15 फेब्रुवारी 2022 रोजी झालेल्या खून प्रकरणाचा गुन्हा 20 फेब्रुवारी 2022 रोजी दाखल झाला. या गुन्ह्यातील वैध वैज्ञानिक प्रयोगशाळेचा अहवाल न आल्यामुळे उच्च न्यायालयाने या प्रकरणातील खुनाचा आरोप असलेल्या आरोपीला आज जामीन मंजूर केला आहे.
दिनांक 15 फेब्रुवारी 2022 रोजी रात्री एक युवकाला मारहाण करून दुसऱ्या युवकाने त्याला सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले 20 फेब्रुवारीच्या रात्री जखमी युवकाचा मृत्यू झाल्यानंतर त्यानंतर त्या संदर्भाने वजिराबाद पोलिसांनी 21 फेब्रुवारी 2022 रोजी खुनाचा गुन्हा दाखल केला.
याबाबत प्रदीपसिंघ गुरुदेवसिंघ तीवाना यांनी दिलेली तक्रार अशी होती की, त्यांचा छोटा बंधू वीरसिंघ गुरुदेवसिंघ तीवाना हा जखमी अवस्थेत सरकारी रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती 16 फेब्रुवारी रोजी प्राप्त झाली. त्याला दवाखान्यात कोणी आणले त्याचे नाव दवाखान्याच्या अभिलेखावर नव्हते.कॉल आलेल्या नंबरची तपासणी केली तेव्हा त्याला दवाखान्यात आणणाऱ्या व्यक्तीचे नाव जयमलसिंघ उर्फ गंगा हरबलसिंघ धारीवाल असे होते. तुला कोणी मारले होते याबाबत विचारणा करून गंगाने तुला मारले होते काय अशी विचारणा वीरसिंघला बंधू प्रदीपसिंघने केल्यानंतर मयत वीरसिंघने होकार दिला होता. मयत वीरसिंघच्या शरीरावर खंजीरचे अनेक घाव होते.वजिराबाद पोलिसांनी गुन्हा क्रमांक ४९/२०२२ भारतीय दंड संहितेच्या कलम 302 आणि भारतीय हत्यार कायदा कलम ४/ २५ नुसार दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवराज जमदाडे यांनी केला.
शिवराज जमदाडे यांनी मारेकरी गंगा उर्फ जयमलसिघ धारीवाल यास अटक केली. त्याच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. या खटल्यात जयमलसिंघच्यावतीने उच्चन्यायालयात जामीन अर्ज क्रमांक १४२५/ २०२२ दाखल करण्यात आला. उच्च न्यायालयाचे वकील एड. शैलेंद्र गंगाखेडकर यांनी गंगा उर्फ जयमलसिंघची बाजू मांडली. त्यांना नांदेड येथील ऍड.अमनपालसिंघ कामठेकर यांनी मदत केली. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आर.जी. अवचट यांनी प्रादेशिक न्याय वैद्यक प्रयोगशाळा नांदेड यांच्याकडून मागवलेला अहवाल प्राप्त झाला नाही. तेव्हा आज ७ ऑक्टोबर २०२२ रोजी खून करण्याचा आरोप असलेल्या जयमसिंघ उर्फ गंगा धारीवाल यास. न्यायालयाने जामीन मंजूर केल्याची माहिती ऍड. अमनपालसिंघ कामठेकर यांनी दिली आहे.
सबंधित बातमी…
https://vastavnewslive.com/2022/02/21/15-फेबु्रवारी-रोजी-मारहाण-झ/