नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील सीबीबी अपार्टमेंट चैतन्यनगर येथे चोरट्यांनी एक घरफोडून 48 हजार रुपयांचा ऐवज चोरला आहे. ही चोरीची घटना सीसीटीव्ही फुटेमध्ये कैद झाली आहे.
अब्दुल हबीब खान अब्दुल हमीद खान यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.13 ऑक्टोबरच्या सकाळी 8 ते 8.30 वाजेदरम्यान ते आपल्या किराणा दुकानावर गेले होते. त्यांची पत्नी स्वयंपाक घरात स्वयंपाक करत होती. मोठा मुलगा झोपला होता. लहान मुलगा हॉलमध्ये बसला होता. पण काही वेळासाठी तो बाथरुमध्ये गेला. ही संधी साधून कोणी तरी चोरट्याने त्यांच्या घरातील एक लॅपटॉप, दोन मोबाईल असा एकूण 48 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. पोलीस ठाणे भाग्यनगर येथे हा चोरीचा गुन्हा क्रमांक 350/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 379 नुसार नोंदविण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस अंमलदार कंधारे यांच्याकडे देण्यात आला आहे. चोरीची ही घटना त्या ठिकाणी असणाऱ्या एका सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. भाग्यनगर पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर चोरट्याचा शोध घेत आहेत.