नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा अभिवक्ता संघाने प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांच्या बदलीनंतर त्यांचा निरोप समारंभ रद्द करण्याचा ठराव आज केला आहे. या संदर्भाने अभिवक्ता संघाच्या सर्व सदस्यांनी पदाधिकाऱ्यांनी सुचित करण्यात आले आहे की, प्रमुख जिल्हा न्यायाधीशांचा निषेध व्यक्त करण्यासाठी 15 ऑक्टोबर रोजीच्या आपल्या सर्व तारखा अर्ज देवून वाढवून घ्याव्यात या निवेदनावर अभिवक्ता संघाचे अध्यक्ष ऍड.सतिश पुुंड, सचिव ऍड. नितीन कागणे, उपाध्यक्ष ऍड. विजय बारसे यांच्यासह इतर पदाधिकारी ऍड. ऋषीकेश संतान, ऍड. प्रशांत जगताप, ऍड.संग्राम गायकवाड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. हा ठराव व सुचना ऍड. नितीन कागणे यांनी व्हाटऍप माध्यमातून पाठवल्या आहेत.
आज दि.14 ऑक्टोबर रोजी अभिवक्ता संघाच्या कार्यालयात ऍड. सतिश पुंड यांच्या अध्यक्षतेत बैठक झाली. या बैठकीत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आणेकर यांच्या कार्यकाळात अभिवक्ता संघाने मांडलेल्या अडचणी, विविध तक्रारी निवेदने देवून त्याचे निराकण करण्याची विनंती करण्यात आली होती.12 ऑक्टोबर रोजी न्यायालयातील ज्येष्ठ विधीज्ञ ऍड. अनिल पाटील यांच्यासोबत पोलीस अंमलदार जाधवने हुज्जतबाजी करून आरेरावीची भाषा वापरून अपमान केला होता.
मागील काळात विविध न्यायाधीशांबद्दल अभिवक्ता संघाने केलेल्या तक्रारींची दखल घेण्यात आली नाही. आपल्या या ठरावत अभिवक्ता संघाने न्यायाधीश एस.ई. बांगर, न्यायाधीश रुहिना अंजुम, न्यायाधीश बिरहारी(जगताप) यांच्याकडून होत असलेल्या त्रासाबद्दल सुध्दा कोणतीच कार्यवाही झाली नाही. या सर्व प्रकरणांसाठी 15 ऑक्टोबर रोजी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या वागणूकीसाठी निषेद म्हणून आपल्या दैनंदिन तारखा अर्ज देवून वाढवून घ्याव्यात आणि 15 ऑक्टोबर रोजी त्यांचा नियोजित निरोप समारंभाचा कार्यक्रम रद्द करावा असा ठराव घेण्यात आला. या बद्दलची सुचना वकील सदस्यांना देण्यात आली आहे.