नांदेड(प्रतिनिधी)-माहुर येथील एका वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याचे घरफोडून चोरट्यांनी त्यातून सरकारी बंदुक आणि रोख रक्कम चोरून नेली आहे.
वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित सिदराम जाधव हे माहुर येथे नितीन चव्हाण यांच्या घरात किरायाणे राहतात. 8 ऑक्टोबर ते 13 ऑक्टोबर दरम्यान ते आपल्या कुटूंबियांना घेवून देवदर्शनासाठी बाहेर गावी गेले होते. या दरम्यान कोणी तरी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडीकोंडा तोडून आत प्रवेश केला आणि कपाटात ठेवलेले त्यांची सरकारी बंदुक आणि रोख रक्कम असा 1 लाख 3 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. माहूर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक ए.आर पवार हे करीत आहेत.