नांदेड(प्रतिनिधी)-विक्रीसाठी सोपवलेल्या शेती मालात अपहार करून चार जणांनी अनेक शेतकऱ्यांची फसवणूक करत 21 लाख 76 हजार 615 रुपयांची ठकबाजी केली आहे.
उल्हासनगर तरोडा (खु) येथील शेतकरी विश्र्वंभर जळबा वरवंटकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार श्रीकृष्ण ट्रेडींग कंपनी येथील सुधीर उध्दव ढवळे, उध्दव गंगाधर ढवळे, रघुनाथ पिडगे, रवि गोविंदराव ढवळे या चौघांनी संगणमत करून अनेक शेतकऱ्यांकडून शेतीचे उत्पादीत साहित्य विक्रीसाठी घेतले. पण त्यात अपहार करून अनेकांची 21 लाख 76 हजार 615 रुपयांची फसवणूक केली आहे. शिवाजीनगर पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 377/2022 कलम 420, 406, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक रोडे यांच्याकडे देण्यात आला आहे.