नांदेड(प्रतिनिधी)-पद्मश्री श्यामरावजी कदम यांच्या पुण्यस्मरणानिमित्त लिंबगाव ता. नांदेड येथे कदम कुटूंबीय, गावकरी व विविध राजकीय मान्यवरांनी दि. 15 ऑक्टोबर रोजी पुष्पहार अर्पण विनम्र अभिवादन केले.
पद्मश्री श्यामरावजी कदम यांचा लिंबगाव येथे पुर्णाकृती पुतळा असून या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले. तसेच त्यांच्या लिंबगाव येथील शेतातील समाधीस्थळी अनेक मान्यवरांनी अभिवादन केले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कदम, आ. बालाजी कल्याणकर, डॉ. हंसराज वैद्य, डॉ. सुभाष कदम, डॉ. शिला कदम, सुरेखा कदम यांनी अभिवादन केले.
यावेळी आयोजित अभिवादन कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना आ. बालाजी कल्याणकर म्हणाले की, पद्मश्री श्यामरावजी कदम यांचे सहकार क्षेत्रामधील भरीव कार्य आपल्याला कधीही विसरता येणार नाही. त्यांनी नांदेड जिल्ह्याचे नाव महाराष्ट्रभर केले. शेतकरी, मजूरांना रोजगार उपलब्ध करून दिला. प्रत्येकाला त्या काळात त्यांनी नोकरी लाऊन दिली. त्यांचा अभिमान मला आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.तसेच यावेळी डॉ. हंसराज वैद्य यांनी मनोगत व्यक्त करताना मागील 23 वर्षांच्या कार्यकाळात पद्मश्रींचा विसर पडला नाही. त्यांच्यामुळे मी घडलो. माझ्यासह अनेक जणांचे आयुष्य त्यांनी घडविले. हा भाग कृषीप्रधान केला. त्यांच्या विचारांची गरज समाजाला असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच यावेळी आर.पी. कदम यांनी सांगितले की, 55 संस्थांचे अध्यक्ष पद्मश्री श्यामरावजी कदम होते. नांदेड जिल्ह्यामध्ये सहकार सक्षमपणे त्यांनी चालविले. या भागातील शेतीला पुरक व्यवसाय उपलब्ध करून दिला. हे सर्व श्रेय पद्मश्रींना जाते, असे ते म्हणाले. रंगनाथ वाघ यांनी मनोगतामध्ये पद्मश्रींचे ख्याती दूर-दूरपर्यंत पसरली होती, त्यांच्या शब्दाला किंमत होती, त्यांच्या दूरदृष्टीमुळे शाळा, कृषी, सहकार या क्षेत्राला नवी चालना मिळाली असा नेता होणार नाही, असे ते म्हणाले. आयोजित कार्यक्रमात विविध मान्यवरांनी पद्मश्री श्यामरावजी कदम यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. या कार्यक्रमास नांदेड जिल्ह्यासह पंचक्रोशीतील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
यावेळी शीतल भालके, स्वप्नील कदम, रमा कदम, अशोक कदम, अमोल कदम, भाग्यश्री कदम, डॉ. सुधाकर बोकारे, भीमराव पाटील कदम, आर.पी. कदम, रंगनाथ वाघ, प्रकाश कदम, गंगाधर धवन, डॉ. संजय कदम, धनंजय सुर्यवंशी, कन्हैया कदम, शहाजीराव देसाई, शिवाजीराव स्वराते, राजेश पावडे, बंटी लांडगे, गणेश तादलापूरकर, राहूल जाधव, नाना पोहरे, रमेशराव पावडे, विठ्ठल पाटील नांदुसेकर, प्रकाश मुराळकर, धोंडीबा भालेराव, दौलतराव पोफळे, पांडूरंग पोफळे, गोवर्धन पाटील, तातेराव पाटील, जयेंद्र पाटील, गजानन वाघ, शिवाजी वाघ, शिवाजीराव भालके, साहेबराव गंभीरे, गोपाळराव शिरूळकर, गोपाळराव कदम, विश्वास कदम, बालासाहेब पाटील, वामन कदम, शेख रफीक, प्रशांत गवळे, शिवाजी शिंदे, रमेश देवडे आदी जणांची उपस्थिती होती.
पद्मश्री श्यामराव कदम यांना लिंबगाव येथे अभिवादन