नांदेड(प्रतिनिधी)-एकंबा ता.हिमायतनगर येथे एक घरफोडून चोरट्यांनी 1 लाख 22 हजार रुपयांचा ऐवज चोरला आहे. धर्मानगर तांडा ता.मुखेड येथील शाळेतून विद्यार्थ्यांचे जेवन बनविण्याचे साहित्य 42 हजार 500 रुपये किंमतीचे चोरीला गेले आहे.
एकंबा ता.हिमायतनगर येथील प्रल्हाद शिवराम आडंगे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मौजे एकंबा ता.हिमायतनगर येथील त्यांच्या घरात आणि इतरांच्या घरात 15 ऑक्टोबरच्या मध्यरात्री 1 ते पहाटे 6 वाजेदरम्यान ते एकटे झोपलेले असतांना चेारी झाली. चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिणे असा एकूण 1 लाख 22 हजार 900 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. हिमायतनगर पोलीसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरिक्षक महाजन अधिक तपास करीत आहेत.
धर्मानगर तांडा येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश ठाकूर चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 12 ऑक्टोबरच्या रात्री 8 ते 14 ऑक्टोबरच्या सकाळी 10.30 वाजेदरम्यान तेथील जिल्हा परिषद शाळा केंद्र बाऱ्हाळीचे शाळा आणि अंगणवाडीचे कुलूप तोडून चोरट्यांनी त्यातून टी.व्ही आणि विद्यार्थ्यांचे जेवन तयार करण्याचे साहित्य किंमत 42 हजार 500 रुपये असा ऐवज चोरून नेला आहे. मुक्रामाबाद पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार सिध्देश्र्वर अधिक तपास करीत आहेत.
एकंबा ता.हिमायतनगर येथे 1 लाख 22 हजारांची चोरी; जिल्हा परिषद शाळा फोडून चोरी