नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेने एका विधीसंघर्षग्रस्त बालकाकडून 7 चोरीच्या दुचाकी गाड्या आणि 5 चोरीचे मोबाईल असा एकूण 4 लाख 17 हजार 699 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
पोलीस जनसंपर्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार 18 ऑक्टोबर रोजी स्थानिक गुन्हा शाखेचे पथक गस्त करत असतांना त्यांना मिळालेल्या माहिती आधारे त्यांनी पावडेवाडी भागातील एका विधीसंघर्षग्रस्त बालकाच्या घराची तपासणी केली. त्या घरात एकूण 7 दुचाकी गाड्या आणि 5 मोबाईल सापडले. हे सर्व साहित्य त्याने चोरी केलेले आहेत. या सर्व ऐवजाची किंमत 4 लाख 17 हजार 699 रुपये आहे. या विधीसंघर्षग्रस्त बालकाला पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी पोलीस ठाणे भाग्यनगरच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांनी कामगिरी करणाऱ्या स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर, सहाय्यक पोलीस निरिक्षक पांडूरंग माने, पोलीस उपनिरिक्षक गोविंदराव मुंडे, दत्तात्रय काळे, पोलीस अंमलदार दशरथ जांभळीकर, संजय केंद्रे, बालाजी तेलंग, विठ्ठल शेळके, मोतीराम पवार, महेश बडगू, हेमंत बिचकेवार यांचे कौतुक केले आहे.
या बातमीसोबत पोलीसांनी जप्त केलेल्या 7 दुचाकी गाड्या आणि 5 मोबाईल बाबत पोलीसांनी प्रसिध्द केलेले इंजिन नंबर, चेसीस नंबर आणि आयएमईआय क्रमांक आम्ही जोडत आहोत यातील कोणाची गाडी असेल, कोणाचा मोबाईल असे तर त्यांनी या बाबत भाग्यनगर पोलीस ठाणे किंवा स्थानिक गुन्हा शाखा येथे संपर्क साधून आपला ऐवज परत मिळविण्याची कार्यवाही करावी.
